दौंड प्रतिनिधी : ता.०१ ऑगस्ट २०१९
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून यंदा महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. दौंड तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमांमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह गणेशरोड नानगाव येथे प्रतिमेस माजी सरपंच राजकुमार मोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.सचिन शिंदे,माणिक अढागळे,पांडुरंग मोटे,शंकर देवकर,संभाजी खळदकर,शिवाजी खराडे,विशाल आखाडे,महेश खळदकर,प्रमोद खळदकर,स्वप्नील काळे,अंगणवाडी सेविका व आदि मान्यवर उपस्थित होते.