दौंड प्रतिनिधी ता.०३ ऑगस्ट २०१९
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमधील कारागिरांचे बदलते चित्र सद्यस्थितीची चुणूक दाखवणार दिसत आहे. दौंड तालुक्यातील काळेवाडी येथील नामदेव खाडे या सुशिक्षित बेरोजगार तरुणाने केशकर्तनालयाचा व्यवसाय सुरू केला आहे. विशेष म्हणजे हा युवक नाभिक समाजातून नाही. ग्रामीण भागांमध्ये आतापर्यंत नाभिक व्यवसायिकच फक्त केश कर्तनालयाची दुकानं चालवत असतात. मात्र या सुशिक्षित तरुण बेरोजगारांने केस कर्तनाचा व्यवसाय चालू करण्याचं धाडस केल्यामुळे गावांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
बदलत्या परिस्थितीनुसार येईल ते काम करण्याकडे आणि ज्या ठिकाणी लोकांचे लक्ष नाही.अशा प्रकारचे व्यवसाय करण्याकडे व्यवहारचातुर्य म्हणून या तरुणाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
त्याच्या या नवीन दुकानाचा शुभारंभ शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वयक शरदचंद्र सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते यावेळी करण्यात आला.
त्याप्रसंगी शिवसेनेचे काळेवाडी शाखाप्रमुख बापूराव गायकवाड, युवा सेनेचे इंदापूर संघटक नवनाथ सुतार,वासुदेव गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, अच्युत गायकवाड, नामदेव बरडे,निखिल नामुगडे,नामदेव जाधव,पांडुरंग बरडे, तसेच काळेवाडी येथील सर्व स्तरातील लहान-मोठे आबालवृद्ध लोकांनी एकच गर्दी याप्रसंगी केली होती. आणि त्याच्या या निर्णयाचं सर्वांनी मनापासून स्वागत केलेल आहे.