Friday, October 19, 2018

आकाशची पाच दिवस मृत्यूशी झुंज अखेर अपयशी !



पुणे-सोलापूर महामार्गावर दुचाकीचा आणि मोटारीचा अपघात !
आकाशची पाच दिवस मृत्यूशी झुंज अखेर अपयशी !

डी न्यूज लाइव्ह प्रतिनिधी : ता.२० ऑक्टोंबर २०१८
सोलापूर-पुणे महामार्गावर दौंड तालुक्यातील वरवंड शिवारात मोटार आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात आयटीआय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. हा अपघात शनिवार (ता. १३) ला दुपारी घडला होता.
आकाश राजेंद्र अडागळे (वय २१ रा. नानगाव, ता. दौंड) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मयत आकाश व त्याचा मित्र निखिल दामोदरे हे वरवंड येथे आयटीआयमध्ये शिक्षण घेत होते.शनिवारी दुपारी हे दोघे आपल्या दुचाकी क्रमांक (एमएच ४२ डब्ल्यू ७९६२) वरुन वरवंडकडून चौफुलाकडे येत होते. यावेळी पाठीमागून आलेली मोटारीने (एमएच ५० एल १८४१) यांना जोराची धडक दिली. या अपघातात आकाश गंभीर जखमी झाला. आकाश यास पुढील उपचारासाठी हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान आकाश अडागळे या तरुणाचा गुरूवारी मृत्यू झाला. आकाश याचे वडील राजेंद्र तुकाराम अडागळे यांनी मोटार चालका विरोधात  यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी मोटार चालकाविरोधात गुन्ह्यांची नोद केली आहे.