Saturday, October 13, 2018

नानगाव येथील श्री रासाई देवीचा शारदीय नवरात्र उत्सव


नानगाव येथील श्री रासाई देवीचा शारदीय नवरात्र उत्सव 

डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी:ता.१३/१०/२०१८

दौंड तालुक्यातील नानगाव येथील ग्रामदेवता श्री रासाई देवीच्या नवरात्र उत्सवास बुधवारी(ता.१०) रोजी सकाळी घटस्थापना करून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
गावातील ग्रामस्थांच्या वतीने पहाटे प्रथम देवीचा अभिषेक करून साडी चोळी,सोन्याचे अलंकार,व इतर घालून देवीची आरती करण्यात आली.
शारदीय नवरात्र उत्सवात दररोज पहाटे आरती व सायंकाळी देवीचा छबिना व आरती करण्यात येते.
आठव्या माळेला रात्री बारा वाजेनंतर देवीच्या मंदिरात होमहवणाचा कार्यक्रम असतो.
तसेच नवव्या माळेला गुरुवारी(ता.१८) रोजी दसरा सणाला देवीची पालखी ग्रामप्रदक्षिणा करून देवी मंदिरात आल्यानंतर देवीला मंदिरात झोपविले जाते.व नंतर कोजागिरी पौर्णिमेला देवीची आरती करण्यात येते.
या काळात मंदिर बंद असते.व मंदिरातील घंटा देखील बांधून ठेवण्यात येतात.तसेच कीर्तनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवीचे पुजारी राजेंद्र गायकवाड यांनी दिली.
नवरात्र उत्सव काळात मंदिरात पाचव्या व सातव्या माळेला भक्तगणांची मोठी गर्दी असते व या काळात गावातून कामानिमित्त बाहेर असलेली मंडळी सहकुटुंब देवीच्या दर्शनासाठी येत असतात.तसेच परिसरातील भक्तगणही दर्शनासाठी येत असतात.
नवरात्र उत्सवानिमित्ताने मंदिरावर व मंफिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.नवरात्र उत्सव काळात गावातील केशकर्तनालये बंद ठेवण्यात येतात.