पारगावात तरुण एकत्र येऊन करत आहे अवैध वाळू उपसा !
कमी श्रमात खूप सारा पैसा,त्यामुळे अनेक तरुण व्यसनाधीन व गावात दहशतीचे वातावरण
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी:ता.०३/१०/२०१८
दौंड तालुक्यातील पारगाव(सा.मा) येथे वाळू उपसा जोरात चालू आहे.यामध्ये गावातील तरुण एकत्र येऊन तीन ते चार तराफे वाळू उपस्यासाठी चालवतात.भीमा नदीच्या पात्रातून हा वाळू उपसा करून शेजारील शेतकऱ्यांच्या शेतामधून पिकाची नासधूस करून दमदाटीच्या जोरावर सर्रास पणे चालू आहे.
कमी श्रमात हा वाळूचा पैसा आल्याने हे तरुण दारूच्या व्यसनाधीन बनले आहेत.गावात त्यांनी एकप्रकारे दहशत निर्माण केली आहे.त्यामुळे गावातील नागरिक व महिला असुरक्षित आहेत असे गावातील लोक बोलताना पहावयास मिळत आहेत.
आम्ही कुणालाच घाबरत नाही,कोतवाला पासून ,गावकामगार तलाठी,मंडल अधिकारी तसेच तहसीलदार यांना वेळेवर हफ्ता पोहचवला जातो त्यामुळे बिनधास्त पणे जोमाने वाळू उपसा करावयाचा असे ब्रीदच या वाळू बहादरांनी मनाशी बांधले आहे.
काही दिवासापुर्वीच पारगावच्या शेजारी असणाऱ्या देलवडी येथे वाळूच्या वादातून तरुणाची आत्महत्या झाली आहे.असे अनेक प्रकार हे वाळूच्या वादातून दौंड तालुक्यात राजरोसपणे चालू आहेत.
आता महसूल विभाग या वाळू चोरावरती कारवाई करणार का? आपला मलिदा चालूच ठेऊन शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान करणार हे पाहणे आता औचित्याचे ठरणार आहे.