Wednesday, October 31, 2018
Monday, October 29, 2018
Sunday, October 28, 2018
Thursday, October 25, 2018
Monday, October 22, 2018
Saturday, October 20, 2018
Friday, October 19, 2018
आकाशची पाच दिवस मृत्यूशी झुंज अखेर अपयशी !
पुणे-सोलापूर महामार्गावर दुचाकीचा आणि मोटारीचा
अपघात !
आकाशची पाच दिवस मृत्यूशी
झुंज अखेर अपयशी !
डी न्यूज लाइव्ह
प्रतिनिधी : ता.२० ऑक्टोंबर २०१८
सोलापूर-पुणे महामार्गावर दौंड
तालुक्यातील वरवंड शिवारात मोटार आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात आयटीआय
विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. हा अपघात शनिवार (ता. १३) ला
दुपारी घडला होता.
आकाश राजेंद्र अडागळे (वय
२१ रा. नानगाव, ता.
दौंड) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मयत आकाश व त्याचा मित्र निखिल
दामोदरे हे वरवंड येथे आयटीआयमध्ये शिक्षण घेत होते.शनिवारी दुपारी हे दोघे आपल्या
दुचाकी क्रमांक (एमएच ४२ डब्ल्यू ७९६२) वरुन वरवंडकडून चौफुलाकडे येत होते. यावेळी
पाठीमागून आलेली मोटारीने (एमएच ५० एल १८४१) यांना जोराची धडक दिली. या अपघातात
आकाश गंभीर जखमी झाला. आकाश यास पुढील उपचारासाठी हवेली तालुक्यातील लोणी काळभोर
येथील विश्वराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान
आकाश अडागळे या तरुणाचा गुरूवारी मृत्यू झाला. आकाश याचे वडील राजेंद्र तुकाराम
अडागळे यांनी मोटार चालका विरोधात यवत पोलीस ठाण्यात
फिर्याद दाखल केली. पोलिसांनी मोटार चालकाविरोधात गुन्ह्यांची नोद केली आहे.
Thursday, October 18, 2018
Wednesday, October 17, 2018
Saturday, October 13, 2018
नानगाव येथील श्री रासाई देवीचा शारदीय नवरात्र उत्सव
नानगाव येथील श्री रासाई देवीचा शारदीय नवरात्र उत्सव
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी:ता.१३/१०/२०१८
दौंड तालुक्यातील नानगाव येथील ग्रामदेवता श्री रासाई देवीच्या नवरात्र उत्सवास बुधवारी(ता.१०) रोजी सकाळी घटस्थापना करून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
गावातील ग्रामस्थांच्या वतीने पहाटे प्रथम देवीचा अभिषेक करून साडी चोळी,सोन्याचे अलंकार,व इतर घालून देवीची आरती करण्यात आली.
शारदीय नवरात्र उत्सवात दररोज पहाटे आरती व सायंकाळी देवीचा छबिना व आरती करण्यात येते.
आठव्या माळेला रात्री बारा वाजेनंतर देवीच्या मंदिरात होमहवणाचा कार्यक्रम असतो.
तसेच नवव्या माळेला गुरुवारी(ता.१८) रोजी दसरा सणाला देवीची पालखी ग्रामप्रदक्षिणा करून देवी मंदिरात आल्यानंतर देवीला मंदिरात झोपविले जाते.व नंतर कोजागिरी पौर्णिमेला देवीची आरती करण्यात येते.
या काळात मंदिर बंद असते.व मंदिरातील घंटा देखील बांधून ठेवण्यात येतात.तसेच कीर्तनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवीचे पुजारी राजेंद्र गायकवाड यांनी दिली.
नवरात्र उत्सव काळात मंदिरात पाचव्या व सातव्या माळेला भक्तगणांची मोठी गर्दी असते व या काळात गावातून कामानिमित्त बाहेर असलेली मंडळी सहकुटुंब देवीच्या दर्शनासाठी येत असतात.तसेच परिसरातील भक्तगणही दर्शनासाठी येत असतात.
नवरात्र उत्सवानिमित्ताने मंदिरावर व मंफिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.नवरात्र उत्सव काळात गावातील केशकर्तनालये बंद ठेवण्यात येतात.
Tuesday, October 9, 2018
नानगाव मध्ये 32 गॅस जोडचे वाटप !
नानगाव मध्ये 32 गॅस जोडचे वाटप !
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी: ता.१०/१०/२०१८
पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत दौंड तालुक्यातील नानगाव येथे मंगळवारी (ता.०९) रोजी ३२ लाभार्थी महिलांना मोफत एच.पी. गॅसचे वाटप करण्यात आले.
आतापर्यंत नानगावात लाभार्थी महिलांना एकूण ५०० गॅसचे वाटप करण्यात आले आहे असे यावेळी एच पी गॅसचे बोरीपरधी वितरक संपत मगर यांनी सांगितले.
उर्वरित लाभार्थी महिला याना वेळोवेळी गॅस चे वाटप करण्यात येणार आहे व त्याचा सर्वाना लाभ होणार आहे .
या कार्यक्रमाच्या वेळी सरपंच सी.बी.खळदकर, माजी सरपंच विश्वास भोसले,भगवान झंवर,दादासाहेब खळदकर,प्रल्हाद रासकर,अमृत रासकर,तंटामुक्ती अध्यक्ष संजय रासकर व आदी मान्यवर उपस्थित होते.
Monday, October 8, 2018
धनगर समाजाची नागपूर ते पंढरपूर संघर्ष यात्रा !
धनगर समाजाची नागपूर ते पंढरपूर संघर्ष यात्रा
डी न्यूज लाइव्ह प्रतिनिधी | केडगाव | - धनगर समाजाला हिवाळी अधिवेशनापर्यंत अनुसुचित जमातीच्या सवलती दिल्या नाही तर पंढरपूर येथे आमरण उपोषण करण्यात येईल. त्या अगोदर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समाज 22 ऑक्टोबरपासून नागपूर ते पंढरपूर संघर्ष रथयात्रा काढणार आहे. असा इशारा दौंड तालुक्यातील चौफुला येथे देण्यात आला आहे. 2014 मध्ये बारामतीतील आरक्षण आंदोलनाची पुनरावृत्ती पंढरपुरात होणार का अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
आरक्षणाच्या लढयासाठी चौफुला येथे राज्यस्तरीय चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते. रथ यात्रेच्या आयोजनासाठी धनगर समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेमध्ये संघर्ष रथ यात्रेची माहिती देण्यात आली. राज्य समन्वय समितीचे सदस्य बापूसाहेब हाटकर ( मुंबई ), संदीपान नरवटे ( मराठवाडा ), विठ्ठल मारनर ( उत्तर महाराष्ट्र ), पांडुरंग मेरगळ व अशोक चोरमले ( पश्चिम महाराष्ट्र ), राम मरगळे ( कोकण ), देवेंद्र उगे ( विदर्भ ) श्रावण वाकसे ( मुंबई ) हजर होते.
संघर्ष यात्रा 22 ऑक्टोबरला नागपूर येथून प्रस्थान करेल. चार चाकी वाहनांमधून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून जाईल. सात नोव्हेंबरला रथ यात्रेचे जेजूरी येथे आगमन होईल. जेजूरी ते पंढरपूर पायी यात्रा निघून ती 17 नोव्हेंबरला पंढरपूर येथे पोहचणार आहे. तेथे महाराष्ट्रातील सकल धनगर समाजाच्यावतीने आमरण उपोषणाला कार्यकर्ते बसतील. एस.टी.चे जात प्रमाणपत्र घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार यावेळी करण्यात आला आहे. धनगर समाज बांधवांनी 17 नोव्हेंबरनंतर पंढरपूर येथे पाठिंब्यासाठी मोठया संख्येने उपस्थित रहावे.
पांडुरंग मेरगळ म्हणाले, हे सरकार समाजासाठी एस.टी. समावेशाची प्रक्रीया राबवत आहे. परंतु घटनेत समाजाचा अनुसुचीत जातीमध्ये समावेश आहे. या आरक्षणाची सरकारने तातडीने अंमलबजावणी सरकारने करावी अशी सकल धनगर समाजाची मागणी आहे. मुळात एसटीमध्ये समावेश करावा अशी मागणी धनगर समाजाने केलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बारामती येथे आश्वासन दिले होते मात्र चार होऊनही त्यांनी ते पुर्ण
केलेले नाही. सरकारने अंमलबजावणी केली नाही तर सरकारला ही आंदोलनाची झळ बसल्याशिवाय राहणार नाही. अॅड. दौलत ठोंबरे म्हणाले, इतर राज्यांनी केंद्राची शिफारस न घेता धनगर समाजाचा समावेश एसटीमध्ये केला आहे.
यावेळी तळोदा संस्थानचे संस्थानिक अमरसिंहराजे बारगळ, मोरेश्वर झिले, आनंद थोरात, अॅड.जी.बी.गावडे, अॅड. दौलत ठोंबरे, महेश नाईक, विजय गावडे, राधाकिसन रौंधळे, बाळासाहेब कोळेकर, संगिता डोके, पांडुरंग रूपनवर, बाळासाहेब तोंडेपाटील, विठ्ठल कोकरे, तुकाराम साठे, पोपट मेरगळ, ललित बंडगर, बाळासाहेब गरदरे, डॅा. प्रशांत शेंडगे, डॅा.अभिमन्यू टकले, रमेश वाघे उपस्थित होते.
Friday, October 5, 2018
जिलेटीनच्या साह्यय्याने पारगाव मधील अवैध वाळू उपसा करणारे तराफे उद्धवस्त !
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी: ता.०५/१०/२०१८
दौंड तालुक्यातील पारगाव येथे अनेक दिवसापासून भीमा नदी पात्रात तराफ्याच्या साह्याने वाळु उपशा होत असल्या बाबतची तक्रार महसुल विभागाला मिळाली होती, त्यानंतर दौंडचे तहसिलदार बालाजी सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तराफे उध्वस्त करण्यात आले , यावळी निवासी नायब तहसीलदार सचिन आखाडे , मंडल अधिकारी विजय खारतोडे,प्रकाश भोंडवे. तलाठी उध्दव गोसावी. सचिन जगताप. दिपक पांढरपट्टे. रवि फणसे यांनी हि कारवाई केली, या कारवाई मुळे वाळु उपशा करणा-यांचे धाबे दणाणले आहे,
Wednesday, October 3, 2018
पारगावात तरुण एकत्र येऊन करत आहे अवैध वाळू उपसा !
पारगावात तरुण एकत्र येऊन करत आहे अवैध वाळू उपसा !
कमी श्रमात खूप सारा पैसा,त्यामुळे अनेक तरुण व्यसनाधीन व गावात दहशतीचे वातावरण
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी:ता.०३/१०/२०१८
दौंड तालुक्यातील पारगाव(सा.मा) येथे वाळू उपसा जोरात चालू आहे.यामध्ये गावातील तरुण एकत्र येऊन तीन ते चार तराफे वाळू उपस्यासाठी चालवतात.भीमा नदीच्या पात्रातून हा वाळू उपसा करून शेजारील शेतकऱ्यांच्या शेतामधून पिकाची नासधूस करून दमदाटीच्या जोरावर सर्रास पणे चालू आहे.
कमी श्रमात हा वाळूचा पैसा आल्याने हे तरुण दारूच्या व्यसनाधीन बनले आहेत.गावात त्यांनी एकप्रकारे दहशत निर्माण केली आहे.त्यामुळे गावातील नागरिक व महिला असुरक्षित आहेत असे गावातील लोक बोलताना पहावयास मिळत आहेत.
आम्ही कुणालाच घाबरत नाही,कोतवाला पासून ,गावकामगार तलाठी,मंडल अधिकारी तसेच तहसीलदार यांना वेळेवर हफ्ता पोहचवला जातो त्यामुळे बिनधास्त पणे जोमाने वाळू उपसा करावयाचा असे ब्रीदच या वाळू बहादरांनी मनाशी बांधले आहे.
काही दिवासापुर्वीच पारगावच्या शेजारी असणाऱ्या देलवडी येथे वाळूच्या वादातून तरुणाची आत्महत्या झाली आहे.असे अनेक प्रकार हे वाळूच्या वादातून दौंड तालुक्यात राजरोसपणे चालू आहेत.
आता महसूल विभाग या वाळू चोरावरती कारवाई करणार का? आपला मलिदा चालूच ठेऊन शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान करणार हे पाहणे आता औचित्याचे ठरणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)