पालकांनी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नक्कीच आत्मचिंतन करण्याची गरज :डॉ.वर्षाताई शिवले
डी न्यूज प्रतिनिधि :शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका डॉ.वर्षाताई शिवले यांनी महाराष्ट्र दिनी ध्वजारोहन केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने डॉ.वर्षाताई शिवले यांच्या प्रयत्नातून वढू बुद्रुक येथील विद्यालयास ५००००/- रुपयांचा चा धनादेश आज दि. १ मे ला सुपूर्द करण्यात आला. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यासाठी संगीत साहीत्य खरेदी करण्यासाठी आणखी ५००००/- रुपये उपलब्ध करून देण्याचे डॉ. शिवले यांनी यावेळी जाहीर केले. या विद्यालयातील ९ वीच्या मुलींनीच पहिले १ ते १५ क्रमांक मिळवत शैक्षणिक बाजी मारली. तर १६ वा क्रमांक विद्यार्थ्याने मिळवला. या सर्वांना आज महाराष्ट्र दिनी विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात डॉ.वर्षा शिवले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. शिवले म्हणाल्या कि, मुलगा हा वंशाचा दिवा मानला जात असताना आज मुली शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असल्याचे पाहावयास मिळत आहे. मुलांच्या पालकांनी मुलाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नक्कीच आत्मचिंतन करण्याची गरज असून पालक व विद्यार्थ्यामध्ये समन्वय राहण्यासाठी महिन्यातून किमान एक दिवस समुपदेशनपर व्याख्यान आयोजित करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यामातून व डॉ. वर्षाताई शिवले यांच्या प्रयत्नातून शिरूर तालुक्यातील धामारी येथील श्री खंडेराया शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कुल विद्यालयास ४०,०००/- हजार रुपये, जयवंत पब्लिक स्कुल तळेगाव ढमढेरे विद्यालयास ५०,०००/- रुपये,न्हावरे येथील साईदीप सार्वजनिक वाचनालयास २५,०००/- रुपये,तर पिंपळे जगताप येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयासखेळणी व शालेय साहित्यासाठी २५,०००/- हजार रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डॉ.वर्षा शिवले यांचे सामाजिक क्षेत्रात सूरु असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल वढू बुद्रुक ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले असून अभिनंदन केले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण भंडारे,मा.अध्यक्ष साहेबराव भंडारे, किसनराव भंडारे ,अर्जुन आप्पा भंडारे, संभाजी शिवले, महिपती शिवले, बाबासाहेब भंडारे ग्रामस्थ व पालक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण यांनी केले. सुत्रसंचालन सोमनाथ भंडारे यांनी तर आभार शिंदे सर यांनी मानले.
रानोबावाडी येथील प्राथमिक शाळेत शालेय व्यस्थापन समिती च्या माजी सदस्या शीतल भंडारे यांच्या हस्ते तर भंडारेवस्ती शाळेत नवनिर्वाचित उपसरपंच श्री रमाकांत शिवले यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.