डी न्यूज लाइव्ह प्रतिनिधि:
दौंड तालुक्यात दहा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची मांदीयाळी
सदस्य पदासाठी 430 व सरपंच पदासाठी 74 एकूण 504 नामनिर्देशन अर्ज दाखल
दौंड तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीचे रनशिंग फुंकले गेले आहे.यामध्ये 07 मे रोजी पासून नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आले होते.काल दि.12 मे रोजी अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिवस असल्याकारणाने अनेक गावनेत्यांची दमछाक होताना पहावयास मिळाली.
जुन्या पुढारांच्या शब्दाखातीर अनेक तरुण कार्यकरत्यानी आपले अर्ज मागे घेतले परंतु त्यांना विचारले असते असे समजले कि,आम्हाला शब्द मिळाला असून पुढच्या पंचवार्षिक ला आपले फिक्स आहे असे सांगण्यात आले.
गाव निहाय आलेले अर्ज:_पांढरेवाडी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी एकूण 33 व सरपंच पदासाठी 07 असे 40 अर्ज जमा झाले आहेत.
पारगाव ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 73 व सरपंच पदासाठी 13 असे एकूण 86 अर्ज जमा झाले आहेत.
खोपोडी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 30 व सरपंच पदासाठी 01 असे एकूण 31 अर्ज जमा झाले आहेत.
केडगाव ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 126 व सरपंच पदासाठी 09 असे एकूण 135 अर्ज जमा झाले आहेत.
वाखारी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 33 व सरपंच पदासाठी 08 असे एकूण 41 अर्ज जमा झाले आहेत.
वाटलुज ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 24 व सरपंच पदासाठी 07 असे एकूण 31 अर्ज जमा झाले आहेत.
नायगाव ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 12 व सरपंच पदासाठी 04 असे एकूण 16 अर्ज जमा झाले आहेत.
कुरकुंभ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 61 व सरपंच पदासाठी 13 असे एकूण 74 अर्ज जमा झाले आहेत.
वडगाव बांडे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 27 व सरपंच पदासाठी 06 असे एकूण 31 अर्ज जमा झाले आहेत.
पानवली ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 11 व सरपंच पदासाठी 06 असे एकूण अर्ज जमा झाले आहेत.
वरील प्रमाणे दौंड तालुक्यातील दहा ग्रामपंचायती साठी सदस्य संख्येत एकूण
430 व सरपंच पदासाठी 74 म्हणजेच 504 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत.