शिव वाहतूक सेना केडगाव शाखेचे उदघाटन
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी : केडगाव ता.दौंड रेल्वे स्टेशन येथे महाराष्ट्र दिनी शिव वाहतुक सेना केडगाव शाखेचे उदघाटन शिवसेना उप-जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी २६ रिक्षा चालकांनी शिव वाहतुक सेनेत प्रवेश केला.तालुका समन्वयक चंद्रकांत पिसे,तालुका प्रमुख राजाभाउ कुलकर्णी,उप तालुका प्रमुख राजाभाऊ शेळके,राजेंद्र मासाळ,निलेश मेमाणे,संतोष नेवसे,वैभव वैद्य,डॉ. कांबळे, हनुमंत निगडे, श्रीकांत खोमणे, सागर मसुडगे,आदी शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी हिरामण चव्हाण यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.