Sunday, May 6, 2018

तुम्ही स्वत:च गॅस सिलिंडर एजन्सीतून आणल्यास तुम्हालाच मिळतात पैसे, जाणून घ्या नियम


तुम्ही स्वत:च गॅस सिलिंडर एजन्सीतून आणल्यास तुम्हालाच मिळतात पैसे, जाणून घ्या नियम

डी न्यूज विशेष प्रतिनिधि:गॅस सिलिंडर तर प्रत्येक घरात वापरले जाते, परंतु याच्याशी निगडित नियमांची-कायद्यांची बहुतेकांना माहिती नसते. तुम्हाला माहितीये- जर एखाद्या गॅस एजन्सीने तुम्हाला सिलिंडरची होम डिलिव्हरी दिली नाही आणि तुम्हाला सिलिंडर घ्यायला एजन्सीच्या गोडाउनमध्ये जावे लागले तर तुम्ही संबंधित एजन्सीकडून एक निश्चित रक्कम घेऊ शकता.
काही महिन्यांपूर्वीच या रकमेत वाढ करण्यात आली आहे. कोणत्याही एजन्सीच्या गोडाउनमधून तुम्ही सिलिंडर आणले तर 19 रुपये 50 पैसे परत घेऊ शकता. कोणतीही एजन्सी ही रक्कम द्यायला ग्राहकाला नकार देऊ शकत नाही. सर्व कंपन्यांच्या सिलिंडरसाठी ही रक्कम निश्चित केलेली आहे.
याआधी हीच रक्कम 15 रुपये होती, यानंतर ती वाढवून 19 रुपये 50 पैसे करण्यात आली आहे.

कोणी नकार दिला तर येथे तक्रार करू शकता.एखाद्या एजन्सी संचालकाने तुम्हाला ही रक्कम देण्यास नकार दिला तर तुम्ही टोल फ्री नंबर 18002333555 त्याची तक्रार करू शकता. सध्या ग्राहकांना सबसिडीवाले 12 सिलिंडर दिले जातात. हा कोटा पूर्ण झाल्यावर मार्केट रेटने सिलिंडर खरेदी करावे लागते.