Tuesday, May 15, 2018

दौंडमध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन


दौंडमध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन

दौंड प्रतिनिधी :  कै.सुभाषआण्णा कुल चॅरिटेबल मेमोरिबल ट्रस्टच्या माध्यमातून शुक्रवारी (दि. 18) रोजी महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दौंड तालुक्‍याचे आमदार अँड. राहुल कुल यांनी दिली.
समाजातील आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल,मागास आणि गरजू रुग्णांना योग्य वैद्यकीय मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्र शासन,आरोग्य विभाग, पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग,धर्मादाय आयुक्त संलग्न रुग्णालये, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना,दौंड तालुका आणि शहर मेडिकल असोसिएशन,रोटरी क्‍लब ऑफ दौंड,निमा दौंड,भीमथडी शिक्षण संस्था दौंड,दौंड तालुका केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै.सुभाषआण्णा कुल चॅरिटेबल मेमोरिबल ट्रस्टच्या माध्यमातून महाआरोग्य मेळावा 2018 दौंडचे आयोजन कुरकुंभ रोड, दौंड येथे करण्यात आले आहे.पुणे जिल्ह्यासह मुंबईमधील अनेक नामवंत रुग्णालयांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती आमदार अँड. कुल यांनी दिली.
या महाआरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया,अँजिओप्लास्टी,बायपास शस्त्रक्रिया,सांधे बदलणे,डोळ्यांचे नंबर तपासणे आणि चष्मे वाटप,लहान मुलांचे टाळू व दुभंलेले ओठ शस्त्रक्रिया,हॅर्निया हायड्रोसिल,गर्भ पिशवीची शस्त्रक्रिया,सर्व प्रकारच्या कॅन्सरवरील उपचार,टूडी इको तपासणी,आवश्‍यकतेनुसार एमआरआय तपासणी आदी तपासण्या आणि शस्त्रक्रिया मोफत करून दिल्या जाणार असल्याची माहिती आमदार अँड.राहुल कुल यांनी पुढे बोलताना दिली. या मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांच्या आजाराचे प्राथमिक निदान झाल्यानंतर आवश्‍यक त्या सर्व तपासण्या आणि पुढील उपचार सहभागी असलेल्या रुग्णालयांच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.या मेळाव्यासाठी नावनोंदणी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय दौंड,ग्रामीण रुग्णालय यवत,तसेच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि आपल्या खाजगी डॉक्‍टर्सकडे संपर्क साधण्याचे आवाहन आमदार कुल यांनी केले आहे.

Sunday, May 13, 2018

दौंड तालुक्यात दहा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची मांदीयाळी


डी न्यूज लाइव्ह प्रतिनिधि:
दौंड तालुक्यात दहा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची मांदीयाळी

सदस्य पदासाठी 430 व सरपंच पदासाठी 74 एकूण 504 नामनिर्देशन अर्ज दाखल

दौंड तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीचे रनशिंग फुंकले गेले आहे.यामध्ये 07 मे रोजी पासून नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आले होते.काल दि.12 मे रोजी अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिवस असल्याकारणाने अनेक गावनेत्यांची दमछाक होताना पहावयास मिळाली.
जुन्या पुढारांच्या शब्दाखातीर अनेक तरुण कार्यकरत्यानी आपले अर्ज मागे घेतले परंतु त्यांना विचारले असते असे समजले कि,आम्हाला शब्द मिळाला असून पुढच्या पंचवार्षिक ला आपले फिक्स आहे असे सांगण्यात आले.
गाव निहाय आलेले अर्ज:_पांढरेवाडी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी एकूण 33 व सरपंच पदासाठी 07 असे 40 अर्ज जमा झाले आहेत.
पारगाव ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 73 व सरपंच पदासाठी 13 असे एकूण 86 अर्ज जमा झाले आहेत.
खोपोडी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 30 व सरपंच पदासाठी 01 असे एकूण 31 अर्ज जमा झाले आहेत.
केडगाव ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 126 व सरपंच पदासाठी 09 असे एकूण 135 अर्ज जमा झाले आहेत.
वाखारी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 33 व  सरपंच पदासाठी 08 असे एकूण 41 अर्ज जमा झाले आहेत.
वाटलुज ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 24 व  सरपंच पदासाठी 07 असे एकूण 31 अर्ज जमा झाले आहेत.
नायगाव ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 12 व सरपंच पदासाठी 04 असे एकूण 16 अर्ज जमा झाले आहेत.
कुरकुंभ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 61 व सरपंच पदासाठी 13 असे एकूण 74 अर्ज जमा झाले आहेत.
वडगाव बांडे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 27 व सरपंच पदासाठी 06 असे एकूण 31 अर्ज जमा झाले आहेत.
पानवली ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 11 व सरपंच पदासाठी 06 असे एकूण अर्ज जमा झाले आहेत.
वरील प्रमाणे दौंड तालुक्यातील दहा ग्रामपंचायती साठी सदस्य संख्येत एकूण 
430 व सरपंच पदासाठी 74 म्हणजेच 504 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत.

Sunday, May 6, 2018

तुम्ही स्वत:च गॅस सिलिंडर एजन्सीतून आणल्यास तुम्हालाच मिळतात पैसे, जाणून घ्या नियम


तुम्ही स्वत:च गॅस सिलिंडर एजन्सीतून आणल्यास तुम्हालाच मिळतात पैसे, जाणून घ्या नियम

डी न्यूज विशेष प्रतिनिधि:गॅस सिलिंडर तर प्रत्येक घरात वापरले जाते, परंतु याच्याशी निगडित नियमांची-कायद्यांची बहुतेकांना माहिती नसते. तुम्हाला माहितीये- जर एखाद्या गॅस एजन्सीने तुम्हाला सिलिंडरची होम डिलिव्हरी दिली नाही आणि तुम्हाला सिलिंडर घ्यायला एजन्सीच्या गोडाउनमध्ये जावे लागले तर तुम्ही संबंधित एजन्सीकडून एक निश्चित रक्कम घेऊ शकता.
काही महिन्यांपूर्वीच या रकमेत वाढ करण्यात आली आहे. कोणत्याही एजन्सीच्या गोडाउनमधून तुम्ही सिलिंडर आणले तर 19 रुपये 50 पैसे परत घेऊ शकता. कोणतीही एजन्सी ही रक्कम द्यायला ग्राहकाला नकार देऊ शकत नाही. सर्व कंपन्यांच्या सिलिंडरसाठी ही रक्कम निश्चित केलेली आहे.
याआधी हीच रक्कम 15 रुपये होती, यानंतर ती वाढवून 19 रुपये 50 पैसे करण्यात आली आहे.

कोणी नकार दिला तर येथे तक्रार करू शकता.एखाद्या एजन्सी संचालकाने तुम्हाला ही रक्कम देण्यास नकार दिला तर तुम्ही टोल फ्री नंबर 18002333555 त्याची तक्रार करू शकता. सध्या ग्राहकांना सबसिडीवाले 12 सिलिंडर दिले जातात. हा कोटा पूर्ण झाल्यावर मार्केट रेटने सिलिंडर खरेदी करावे लागते.

Thursday, May 3, 2018

दौंड तालुका : ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी


                           
                          दौंड तालुका : ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी

Subscriber Channel & like D News Live On YouTube / Facebook dnewslive.blogspot.com बातम्या व जाहिराती साठी संपर्क 8482921606 / 9850206977

पालकांनी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नक्कीच आत्मचिंतन करण्याची गरज :डॉ.वर्षाताई शिवले


पालकांनी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नक्कीच आत्मचिंतन करण्याची गरज :डॉ.वर्षाताई शिवले

डी न्यूज प्रतिनिधि :शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका डॉ.वर्षाताई शिवले यांनी महाराष्ट्र दिनी ध्वजारोहन केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने डॉ.वर्षाताई शिवले यांच्या प्रयत्नातून  वढू बुद्रुक येथील विद्यालयास  ५००००/- रुपयांचा चा धनादेश आज दि. १ मे ला सुपूर्द करण्यात  आला. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यासाठी संगीत साहीत्य खरेदी करण्यासाठी आणखी ५००००/-  रुपये उपलब्ध करून देण्याचे डॉ. शिवले यांनी यावेळी जाहीर केले. या विद्यालयातील ९ वीच्या मुलींनीच पहिले १ ते १५ क्रमांक मिळवत शैक्षणिक बाजी मारली. तर १६ वा क्रमांक विद्यार्थ्याने मिळवला. या सर्वांना आज महाराष्ट्र दिनी विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात डॉ.वर्षा शिवले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. शिवले म्हणाल्या कि, मुलगा हा वंशाचा दिवा मानला जात असताना आज मुली शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असल्याचे पाहावयास मिळत आहे. मुलांच्या पालकांनी मुलाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नक्कीच आत्मचिंतन करण्याची गरज असून पालक व विद्यार्थ्यामध्ये समन्वय राहण्यासाठी महिन्यातून किमान एक दिवस समुपदेशनपर व्याख्यान आयोजित करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यामातून व डॉ. वर्षाताई शिवले यांच्या प्रयत्नातून शिरूर तालुक्यातील धामारी येथील श्री खंडेराया शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कुल विद्यालयास ४०,०००/- हजार रुपये, जयवंत पब्लिक स्कुल तळेगाव ढमढेरे विद्यालयास ५०,०००/- रुपये,न्हावरे येथील साईदीप सार्वजनिक वाचनालयास २५,०००/- रुपये,तर पिंपळे जगताप येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयासखेळणी व शालेय साहित्यासाठी २५,०००/- हजार रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डॉ.वर्षा शिवले यांचे सामाजिक क्षेत्रात सूरु असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल वढू बुद्रुक ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले असून अभिनंदन केले आहे. यावेळी संस्थेचे  अध्यक्ष लक्ष्मण भंडारे,मा.अध्यक्ष साहेबराव भंडारे, किसनराव भंडारे ,अर्जुन आप्पा भंडारे, संभाजी शिवले, महिपती शिवले, बाबासाहेब भंडारे  ग्रामस्थ व पालक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण यांनी केले. सुत्रसंचालन सोमनाथ भंडारे यांनी तर आभार  शिंदे सर यांनी मानले.
रानोबावाडी येथील प्राथमिक शाळेत शालेय व्यस्थापन समिती च्या माजी सदस्या शीतल भंडारे यांच्या हस्ते तर भंडारेवस्ती शाळेत नवनिर्वाचित उपसरपंच श्री रमाकांत शिवले यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.

दौंड तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीचे बिगुल वाजले !!!



दौंड तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीचे बिगुल वाजले  !!!

डी न्यूज प्रतिनिधी : दौंड तालुक्यामध्ये दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून,यामध्ये पारगाव,केडगाव,खोपोडी,वाखारी,नायगाव,पांढरेवाडी,कुरकुंभ,वाटलुज,वडगाव बांडे,पानवली या ग्रामपंचायती आहेत.
ता.०७ मे ते १२ मे पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करणे,ता.१४ मे रोजी अर्जाची छानणी केली जाईल,ता.१६ मे रोजी अर्ज माघारी घेणे व त्याच दिवशी दु.३वा नंतर चिन्ह वाटप केले जाईल,ता.२७ मे रोजी सकाळी ७.३० वा ते संध्याकाळी ५.३० वा पर्यंत मतदान होईल व दुसर्या दिवशी ता.२८ मे रोजी मतदानाचा निकाल जाहीर केला जाईल.या व्यतिरिक्त राहू,टेळेवाडी,लिंगाळी,हिंगणीबेर्डी,देऊळगाव राजे,खुटबाव अशा आठ ग्रामपंचायत मधील जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.


Wednesday, May 2, 2018

शिव वाहतूक सेना केडगाव शाखेचे उदघाटन




 शिव वाहतूक सेना केडगाव शाखेचे उदघाटन             


          
 डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी : केडगाव ता.दौंड रेल्वे स्टेशन येथे महाराष्ट्र दिनी शिव वाहतुक सेना केडगाव शाखेचे उदघाटन शिवसेना उप-जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी २६ रिक्षा चालकांनी शिव वाहतुक सेनेत प्रवेश केला.तालुका समन्वयक चंद्रकांत पिसे,तालुका प्रमुख राजाभाउ कुलकर्णी,उप तालुका प्रमुख राजाभाऊ शेळके,राजेंद्र मासाळ,निलेश मेमाणे,संतोष नेवसे,वैभव वैद्य,डॉ. कांबळे, हनुमंत निगडे, श्रीकांत खोमणे, सागर मसुडगे,आदी शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी हिरामण चव्हाण यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.