दौंड प्रतिनिधी : ता.२९ जुलै २०१९ दौंड तालुक्यात ऑनलाईन मटका खेळणाऱ्या एकुण नऊ मटका बहाद्दरांणा बोरीपारधी गावच्या हद्दीत न्हावरा -चौफुला राज्य मार्गावर असलेल्या गुरुदत्त फ्लाय अँड हार्डवेअरच्या शेजारी सुरू असलेल्या रॉयल बिंगो नावाच्या ऑनलाईन मटक्यावर दौंड विभागाच्या उपविभागीय पोलीस अधीक्षकांच्या पोलीस पथकाने टाकलेल्या छाप्यात मटका चालविण्याचे साहित्ये असा ५ लाख ६७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर नऊ आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरारी झाले आहेत. ही कारवाई रविवार (दि.२८) रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली आहे.
या प्रकरणी रविंद्र दुर्गा शिंदे (वय ३२ वर्षे रा. केडगाव स्टेशन, बोरीपारधी, ता. दौंड), आनंद बाळासाहेब दिवेकर (वय ३० वर्षे रा. कानगाव, ता. दौंड), भाऊसाहेब वासुदेव फडके (वय ३० वर्षे रा. वरवंड, ता. दौंड), दत्तात्रय अशोक माळवतकर ( वय ३२ वर्षे रा. कानगाव, ता. दौंड), बाळकृष्ण आत्माराम अवचट (वय ४५ वर्षे रा. केडगाव, ता. दौंड), नायकोबा चिमाजी टूले ( वय २९ वर्षे रा. बोरीपारधी, चौफुला, ता. दौंड), धनराज शिवाजी जगताप (वय ३५ वर्षे रा. कानगाव, ता. दौंड), नवनाथ आनंदा दळवी (वय ३८ वर्षे रा. पाटस, ता. दौंड), सुधीर आनंदराव जाधव (वय ३६ वर्षे रा. पाटस रेल्वे स्टेशन, ता. दौंड) या नऊ आरोपींना अटक केली असून तेजस कांबळे (रा. दौंड) आणि राजू दुर्गा शिंदे (रा. केडगाव, ता. दौंड) हे दोघेजण पळून गेले आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. सचिन बारी यांना बातमी दारामार्फत चौफुला येथे गुरुदत्त फ्लाय अँड हार्डवेअरच्या शेजारी नाव नसलेल्या खोलीत ऑनलाईन मटका सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आज सायंकाळी दौंड उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार असिफ शेख, पोलीस नाईक दिपक वायकर, विजय पवार, पोलीस शिपाई गणेश कडाळे, किशोर वाघ, कमलेश होले, अभिजित चांदगुडे, सुरज गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल दिपक यादव, सोमनाथ सुपेकर, होमगार्ड इरफान शेख यांच्या पथकाने ही याठिकाणी छापा टाकीत कारवाई केली. या कारवाईत मटका चालविण्यासाठी लागणारे दहा कॉम्प्युटर, एक लॅपटॉप व आदी साहित्ये, रोख ७८ हजार रुपये असा एकूण ५ लाख ६७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तर नऊ आरोपींना अटक केली असून दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. सर्व अकरा आरोपी विरोधात मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम कलम- ४,५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे करीत आहेत.