Sunday, August 11, 2019

न्यू अंबिका कला केंद्राच्या वतीने पूरग्रस्तांनासाठी जिवनावश्यक गोष्टींची मदत !


केडगाव प्रतिनिधी : ता.११ ऑगस्ट २०१९
दौंड तालुक्यातील न्यू अंबीका कला केंद्र,वाखारी यांच्या वतीने सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक गोष्टींची मदत !

 पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील न्यु अंबीका कला केंद्र तर्फे सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत म्हणून पाण्याच्या बाटल्या,चिवडा,बिस्कीट,चिक्की अशी  जीवनावश्यक वस्तू पाठवल्या आहेत 
न्यु अंबीका कला केंद्रातील जवळपास सर्व कलाकार या लातुर येथील आहेत.लातुर येथे दोन वर्षापुर्वि दुष्काळ पडला होता तेव्हा सांगली कोल्हापुरच्या जनतेने लातुर करांना रेल्वेने पाणी पाठवले होते याचीच परतफेड म्हनुन सांगली कोल्हापुर पुरग्रस्थांना मदतीचा हात म्हणून जिवनावश्यक वस्तु पाठवत न्यु अंबीका कला केंद्राने मदतीचा हात पुढे केलाय.न्यु अंबिका कला नाट्य केंद्र कायम अशा सामाजीक उपक्रमामधे सहभागी असतात वारकरी संप्रदायाचे स्वागत असो,दुष्काळ असो,गरजवंतांना मदत असो ते कायम पुढे असतात त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Sunday, August 4, 2019

भीमेचा रौद्र अवतार !




पारगाव प्रतिनिधी : ता.०४ ऑगस्ट २०१९ 

पुण्यात पावसाची संततधार सध्या चालू आहे.त्यामुळे दोन दिवसापासून धरण क्षेत्रात पाणी पातळी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

पुण्यावरून बंडगार्डन ७८ हजार व भीमा नदी अंदाजे ३३ हजार असे एकूण दौंड ८५  हजार कुसेक विसर्ग आहे.यानंतर या पाणी पातळीच्या अंदाजानुसार यामध्ये सतत वाढ होत आहे.उजनी धरण  आता पर्यंत ४३% झाले आहे.घोड धरण ७७% झाले आहे.घोड धरणात सकाळी  ९:०० वा. ८०% पाणीसाठा झाला असून  धरणात पाण्याचा वेग वाढत आहे.त्यामुळे  पूर नियंत्रणासाठी आज ता.०४ ऑग सकाळी ११:०० वाजता  घोड धरणातुन घोड नदीत २१६० पाणी क्यूसेकने सोडण्यात आले आहे.तरी घोड नदीकाठच्या व भीमा नदीच्या काठच्या ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी.याबाबत महसूल व पोलीस खाते यांनी आपापल्या यंत्रणेमार्फत  नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याबाबत सुचीत केले आहे.


सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता यांच्या मार्फत दौंड तालुक्यातील राहू गावाजवळील पूल,वाळकी संगम पूल,दहिटणे येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा धरण क्षेत्रात पाऊस सुरु असल्यामुळे या पुलावरील वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी असे पत्र यावेळी पोलीस खाते,महसूल खाते,ग्रामपंचायत विभाग व ई यांना पाठवण्यात आले आहे.
चार ते पाच वर्षापूर्वी नानगाव व वडगाव रासाई या दोन गावांना जोडणारा पूल उभारला होता.या पुलावरून प्रथमताच पुराचे पाणी वाहू लागले आहे.पुलाला काही ठिकाणी चिरा पडण्यास सुरुवात झाली आहे.पाण्याचा वेग व धरण क्षेत्रात सतत चालू असलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी हि वेगाने वाढत असल्याचे पहावयास मिळत होते.

नदीकाठच्या शेतकरी वर्गाच्या शेत जमिनी पाण्याखाली गेल्या असून,त्यातील पिके नेस्तनाबूत झाली आहेत.नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे होऊन आम्हाला नुकसान भरपाई मिळावी यावेळी शेतकरी वर्गानी अशी मागणी केली आहे.
पाण्याची पातळी वाढत आहे त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांनी काळजी घेण्यात यावी असे आव्हान यावेळी महसूल खाते,पोलीस खाते,सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

Saturday, August 3, 2019

भाग -१ | महावितरण मधील झिरो वायरमन आता जाणार घरी !



            भाग -१ 

डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी :ता.०३ ऑगस्ट २०१९
महावितरण कंपनीने बाह्यस्त्रोत कामगारांना पूर्वी कोणतीही शैक्षणिक अहर्ता नसल्या कारणाने शिकाऊ म्हणून कामावर रुजू केले होते.
परंतु आता शासनाच्या आदेशानुसार दहावी पास व आयटीआय इलेक्ट्रिशियन कोर्स असणे आवश्यक आहे.पूर्वी शिकाऊ कामगार मोठ्या प्रमाणात होते.त्यांच्याकडे कोणतीच शैक्षणिक अहर्ता नसयाची व जोखमीचे काम अशा कामगारांना कडून करून घेतले जात असे.
बर्याच वेळा याबाबत दुर्घटना घडल्या आहेत.अशा कामगारांना अपंगत्व आले आहे.जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
परंतु कोणतीच भरपाई मिळत नसयाची.कारण कि,या कामगारांचे अपुरे कागदपत्रे व शैक्षणिक अहर्ता पूर्ण नसल्याने या लोकांना व त्याच्या परिवाराला आर्थिक सहाय्य मिळत नसायचे.
एका व्यक्तीची कागदपत्रे व दुसरा व्यक्ती त्याच्या जागेवर काम करत आहे असे प्रकार सर्यास महावितरनाच्या प्रत्येक डिव्हिजन ला चालू आहे.अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर प्रसार माध्यमाना देण्यात आली आहे.असे होत असताना कोणतेच कागदपत्र महावितरण कडे नसल्याने काम करताना कोणती दुर्घटना झाली तर,महावितरण हातवर करत असे.
कारण कि,हा आमचा कर्मचारी नाही असे महावितरण कडून सांगितले जात असे.व त्या कामगारांना कोणताच मोबदला मिळत नसायचा.
आता देखील या आदेशामुळे इलेक्ट्रिशयन व्यक्ती किंवा त्या शैक्षणिक अहर्ता पूर्ण असणारा उमेदवार पात्र होऊ शकतो.आता हे पाहणे गरजेचे आहे कि,आयटीआय वायरमन ची भरती केली कि,पूर्वीचे शिकाऊ जैसे थे,असेच ठेवले आहेत का? ज्या कामगारांकडे शैक्षणिक अहर्ता पूर्ण नसेल व तो कामगार कामावर आहे तर तो कोणाच्या आशीर्वादाने कामावर आहे असा सवाल सध्या उपस्थित आहे.


शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील सब डिव्हिजन मध्ये असे प्रकार चालू असल्याचे आढळून येत आहेत.याबाबत कनिष्ट अभियंता एम मुलांनी यांनी सांगितले कि,ज्यांची शैक्षणिक अहर्ता पूर्ण आहे अशाच कामगारांना आम्ही रुजू करून घेत आहोत.कामगार नेमण्यासाठी खाजगी कंपनीकडे सर्व जबाबदारी सोपवली आहे.ज्यांची शैक्षणिक अहर्ता पूर्ण नाही त्या कामगारांना मिळालेल्या परिपत्रकानुसार कामावरून कमी केले जाणार आहे.
               -एम.ए.मुलांणी (कनिष्ठ अभियंता,मांडवगण फराटा)

शैक्षणिक अहर्ता पूर्ण असलेल्या उमेदवारांनी संबधित कंपनीकडे संपर्क साधण्याचे आव्हान यावेळी कार्यकारी अभियंता आर.एस.येडके यांनी केले आहे.
                   -आर.एस.येडके (कार्यकारी अभियंता)




Friday, August 2, 2019

सुशिक्षित तरुण बेरोजगारांने चालू केला केशकर्तनालयाचा व्यवसाय !

दौंड प्रतिनिधी ता.०३ ऑगस्ट २०१९
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमधील कारागिरांचे बदलते चित्र सद्यस्थितीची चुणूक दाखवणार दिसत आहे. दौंड तालुक्यातील काळेवाडी येथील नामदेव खाडे या सुशिक्षित बेरोजगार तरुणाने केशकर्तनालयाचा व्यवसाय सुरू केला आहे. विशेष म्हणजे हा युवक नाभिक समाजातून नाही. ग्रामीण भागांमध्ये आतापर्यंत नाभिक व्यवसायिकच फक्त केश कर्तनालयाची दुकानं चालवत असतात. मात्र या सुशिक्षित तरुण बेरोजगारांने केस कर्तनाचा व्यवसाय चालू करण्याचं धाडस केल्यामुळे गावांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. 
बदलत्या परिस्थितीनुसार येईल ते काम करण्याकडे आणि ज्या ठिकाणी लोकांचे लक्ष नाही.अशा प्रकारचे व्यवसाय करण्याकडे व्यवहारचातुर्य म्हणून या तरुणाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. 
त्याच्या या नवीन दुकानाचा शुभारंभ शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वयक शरदचंद्र सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते यावेळी करण्यात आला.
 त्याप्रसंगी शिवसेनेचे काळेवाडी शाखाप्रमुख बापूराव गायकवाड, युवा सेनेचे इंदापूर संघटक नवनाथ  सुतार,वासुदेव गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, अच्युत गायकवाड, नामदेव बरडे,निखिल नामुगडे,नामदेव जाधव,पांडुरंग बरडे, तसेच काळेवाडी येथील सर्व स्तरातील लहान-मोठे आबालवृद्ध लोकांनी एकच गर्दी याप्रसंगी केली होती. आणि त्याच्या या निर्णयाचं सर्वांनी मनापासून स्वागत केलेल आहे.

Thursday, August 1, 2019

दौंड तालुक्यात अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष उत्सहात साजरे !


दौंड प्रतिनिधी : ता.०१ ऑगस्ट २०१९   
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून यंदा महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. दौंड तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमांमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह गणेशरोड नानगाव येथे प्रतिमेस माजी सरपंच राजकुमार मोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.सचिन शिंदे,माणिक अढागळे,पांडुरंग मोटे,शंकर देवकर,संभाजी खळदकर,शिवाजी खराडे,विशाल आखाडे,महेश खळदकर,प्रमोद खळदकर,स्वप्नील काळे,अंगणवाडी सेविका व आदि मान्यवर उपस्थित होते.