Wednesday, January 9, 2019

पारगावकर बिबट्याच्या हल्ल्याने भयभीत !

पारगावकर बिबट्याच्या हल्ल्याने भयभीत !
प्रतिनिधी :  दौंड तालुक्यातील पारगाव (सा .मा) येथील कवडेवाडीतील  जनार्धन पांडुरंग कऱ्हे या शेतकऱ्याच्या ता .०९ जाने  रोजी बिबट्याने मध्यरात्री २
ते ३ वाजण्याच्या सुमारास  ४ शेळ्यांचा फडशा पाडला. यापूर्वीही  काल  रात्रीच  गोलांडे वस्ती येथे २ शेळ्या वरती बिबट्याने हल्ला चढवून जागीच मृत केले होते . तसेच या घटना परिसरात वारंवार  होत असून, याकडे वनविभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष  करत  असल्याचे यावेळी येथील नागरिकांनी खंत  व्यक्त  करून  दाखवली.   
कऱ्हे यांच्या घराच्या शेजारीच  जनावराचा  गोठा आहे . यामध्ये  गाई  ,बकरी ,शेळ्या  अशी  जनावरे  आहेत . संपूर्ण  गोठ्याला  जाळीचे  आवरण  आहे . परंतु शेजारीच  असलेल्या उसाच्या  शेतातून  मध्यरात्रीच्या सुमारास  बिबट्याने  खुसकीच्या मार्गाने या  शेळ्यावरती हल्ला चढवून जागीच  मृत  केले . सकाळी  कऱ्हे हे गोठ्यात गेले असता त्यांना हि घटना दिसून आली. त्यानंतर त्यांनी  वनविभागाला  संपर्क  करून  हि  घटना  सविस्तरपणे सांगितली  आहे .परंतु अद्याप पर्यंत कोन्हीही  घटना  स्थळी  फिरकलेले   नाही . 
ग्रामपंचायतीने पाठपुरावा  करून वनविभागाकडून पिंजरा लावणे अपेक्षित आहे.भविष्यात हा  बिबट्या मनुष्यावरती व लहान मुलांवरती हल्ला करेल तरी याला जबाबदार कोण ? लवकरात लवकर  पिंजरा लावावा अशी  मागणी  यावेळी  येथील  स्थानिक  नागरिकांनी  केली आहे .