Tuesday, January 8, 2019

गोपाळ समाजाच्या मागण्या शासनदरबारी पोहचवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार-सुरेश गोरे(आमदार,खेड)


गोपाळ समाजाच्या मागण्या शासनदरबारी पोहचवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार-सुरेश गोरे(आमदार,खेड)
प्रतिनिधी:कधीही एकत्र न दिसणारा हा समाज,परंतु या आपल्या GSM च्या माध्यमातून एकत्र येतोय ही खरच मोलाची बाब आहे.आमचे सत्कार दररोज होत असतात परतू हा सत्कार काही वेगळाच होता? या कार्यक्रमात आल्यानंतर आपल्या माणसात आल्यासारखे वाटले असे सुतोवाच ता.०६ जाने रविवार रोजी गोपाळ समाजहित महासंघ पुणे आयोजित महामेळावा व चाकण खेड राजगुरुनगर शाखा अनावरणाच्या वेळी खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय चौघुले,प्रास्ताविक शहाजी गिरे,सूत्रसंचालन नंदकुमार पवार व उद्धव कालापहाड तसेच आदि मान्यवरांनी आपली मनोगतातून समाजबांधवांना प्रबोधन करण्यात आले.या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मारुती गव्हाणे,गोपाल तागड आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हा कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध पणे पार पाडला.
भटक्या विमुक्त जमाती मध्ये गोपाळ हा समाज आपल्या व्यवसायानिमित भटकंती करत होता आता हा समाज कुठे तरी स्थिरावतोय.आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक या सर्व बाबतीत अतिशय मागसलेला हा समाज सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेताना दिसत आहे.क्रीडा,सौंदर्य स्पर्धा,स्पर्धा परीक्षा व इतर अशा अनेक गोष्टीत या समाजाचे हिरे चमकत आहे.याच हिर्यांचा सन्मान करत असताना गोपाळ समाजहित महासंघ पुणे यांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले.यामध्ये गतवर्षी २०१८ रोजी महाराष्ट केसरी स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावलेले अनिल ब्राह्मणे,मिस इंडिया ची उपविजेती प्रज्ञा कालापहाड,अवयवदान केलेले धनगर कुटुंब अशा अनेक मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या वेळी राजन भाई परदेशी,प्रभाकर तपासे,संजय गव्हाणे,प्रसाद लोणारे(एपीआय),सुभाष गव्हाणे,गोविंद गव्हाणे,भरत गव्हाणे,भरत पवार,शेषराव मोरे,संजय भोसले,शंकर कालापाहाड,रामकृष्ण धनगर,अंबादास वाणी,शहाजी गव्हाणे,माधव काकडे,रमेश महाजन,संतोष मोरे,गजानन मोरे,भाऊसाहेब चौगुले,अशोक गव्हाणे,भाऊसाहेब गिरे,मिथुन चौघुले,सादिक चौगुले,प्रदीप गव्हाणे,पिंटू चौगुले,पिंटू गव्हाणे व आदि मान्यवर उपस्थित होते.