Tuesday, January 1, 2019

चाकण येथे गोपाळ समाजहित महासंघाच्या भव्य महामेळाव्याचे आयोजन


चाकण येथे गोपाळ समाजहित महासंघाच्या भव्य महामेळाव्याचे आयोजन

प्रतिनिधी:महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी व शैक्षणिक वारसा लाभलेले शहर शिक्षणाचे माहेरघर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांच्या कर्मभूमी पुणे येथील चाकण या ठिकाणी रविवार रोजी ता.6 जाने सकाळी १०.०० वा गोपाळ समाजहित महासंघ पुणे जिल्हा आयोजित जीएसएम चाकण,राजगुरुनगर,खेड कामगार संघटना शाखा अनावरण व गोपाळ समाजाचा भव्य महामेळावा होणार असून,सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आव्हान यावेळी गोपाळ समाजहित महासंघ पश्चिम महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पवार यांनी केले.
तसेच या महामेळाव्यात गोपाळ समाजहित महासंघाच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये सन १९७३-७४ या सलग दोन वर्षात उप-महाराष्ट्र केसरी व सन १९७५ साली महाराष्ट्र केसरीची गदा मिळवणारे त्याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्ण पदकाची कमाई करून देणारे व महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते निवृत्त कॅपटन रघुनाथ दादा पवार यांना जीवागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.नुकत्याच जालना येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ९७ किलो वजनी गटात अनिल ब्राह्मणे यांनी कांस्य पदक पटकावले आहे त्याबद्दल त्यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.समाजातील एक होतकरू गायिका विजयमाला वंजारी यांना गाण सम्रादणी म्हणून यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील प्रथम होणारा राज्यस्तरीय महामेळाव्यास महाराष्ट्र राज्य,छत्तीसगड,मध्यप्रदेश व इतर राज्यातून गोपाळ समाज बांधव उपस्थित राहणार असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले.यामध्ये गोपाळ समाजाच्या विविध समस्यावर व भटक्या समाजासाठी स्थापन करण्यात आलेला दादा विधाते आयोग शिफारसी तात्काळ लागू करण्यात याव्यात या संबधित चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.