Thursday, January 31, 2019
Wednesday, January 30, 2019
Monday, January 28, 2019
Thursday, January 17, 2019
Sunday, January 13, 2019
Saturday, January 12, 2019
Friday, January 11, 2019
Wednesday, January 9, 2019
पारगावकर बिबट्याच्या हल्ल्याने भयभीत !
पारगावकर बिबट्याच्या हल्ल्याने भयभीत !
प्रतिनिधी : दौंड तालुक्यातील पारगाव (सा .मा) येथील कवडेवाडीतील जनार्धन पांडुरंग कऱ्हे या शेतकऱ्याच्या ता .०९ जाने रोजी बिबट्याने मध्यरात्री २
ते ३ वाजण्याच्या सुमारास ४ शेळ्यांचा फडशा पाडला. यापूर्वीही काल रात्रीच गोलांडे वस्ती येथे २ शेळ्या वरती बिबट्याने हल्ला चढवून जागीच मृत केले होते . तसेच या घटना परिसरात वारंवार होत असून, याकडे वनविभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे यावेळी येथील नागरिकांनी खंत व्यक्त करून दाखवली.
कऱ्हे यांच्या घराच्या शेजारीच जनावराचा गोठा आहे . यामध्ये गाई ,बकरी ,शेळ्या अशी जनावरे आहेत . संपूर्ण गोठ्याला जाळीचे आवरण आहे . परंतु शेजारीच असलेल्या उसाच्या शेतातून मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने खुसकीच्या मार्गाने या शेळ्यावरती हल्ला चढवून जागीच मृत केले . सकाळी कऱ्हे हे गोठ्यात गेले असता त्यांना हि घटना दिसून आली. त्यानंतर त्यांनी वनविभागाला संपर्क करून हि घटना सविस्तरपणे सांगितली आहे .परंतु अद्याप पर्यंत कोन्हीही घटना स्थळी फिरकलेले नाही .
ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून वनविभागाकडून पिंजरा लावणे अपेक्षित आहे.भविष्यात हा बिबट्या मनुष्यावरती व लहान मुलांवरती हल्ला करेल तरी याला जबाबदार कोण ? लवकरात लवकर पिंजरा लावावा अशी मागणी यावेळी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे .
Tuesday, January 8, 2019
गोपाळ समाजाच्या मागण्या शासनदरबारी पोहचवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार-सुरेश गोरे(आमदार,खेड)
गोपाळ समाजाच्या मागण्या
शासनदरबारी पोहचवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार-सुरेश गोरे(आमदार,खेड)
प्रतिनिधी:कधीही एकत्र न
दिसणारा हा समाज,परंतु या आपल्या GSM च्या माध्यमातून एकत्र
येतोय ही खरच मोलाची बाब आहे.आमचे सत्कार दररोज होत असतात परतू हा सत्कार काही
वेगळाच होता? या कार्यक्रमात आल्यानंतर आपल्या माणसात आल्यासारखे वाटले असे
सुतोवाच ता.०६ जाने रविवार रोजी गोपाळ समाजहित महासंघ पुणे आयोजित महामेळावा व
चाकण खेड राजगुरुनगर शाखा अनावरणाच्या वेळी खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष
दत्तात्रय चौघुले,प्रास्ताविक शहाजी गिरे,सूत्रसंचालन नंदकुमार पवार व उद्धव
कालापहाड तसेच आदि मान्यवरांनी आपली मनोगतातून समाजबांधवांना प्रबोधन करण्यात आले.या
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मारुती गव्हाणे,गोपाल तागड आणि त्यांचे सर्व सहकारी
यांनी हा कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध पणे पार पाडला.
भटक्या विमुक्त जमाती मध्ये
गोपाळ हा समाज आपल्या व्यवसायानिमित भटकंती करत होता आता हा समाज कुठे तरी
स्थिरावतोय.आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक या सर्व बाबतीत अतिशय मागसलेला हा समाज सर्वच
क्षेत्रात उंच भरारी घेताना दिसत आहे.क्रीडा,सौंदर्य स्पर्धा,स्पर्धा परीक्षा व
इतर अशा अनेक गोष्टीत या समाजाचे हिरे चमकत आहे.याच हिर्यांचा सन्मान करत असताना
गोपाळ समाजहित महासंघ पुणे यांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले.यामध्ये गतवर्षी
२०१८ रोजी महाराष्ट केसरी स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावलेले अनिल ब्राह्मणे,मिस
इंडिया ची उपविजेती प्रज्ञा कालापहाड,अवयवदान केलेले धनगर कुटुंब अशा अनेक
मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या वेळी राजन भाई परदेशी,प्रभाकर
तपासे,संजय गव्हाणे,प्रसाद लोणारे(एपीआय),सुभाष गव्हाणे,गोविंद गव्हाणे,भरत
गव्हाणे,भरत पवार,शेषराव मोरे,संजय भोसले,शंकर कालापाहाड,रामकृष्ण धनगर,अंबादास
वाणी,शहाजी गव्हाणे,माधव काकडे,रमेश महाजन,संतोष मोरे,गजानन मोरे,भाऊसाहेब चौगुले,अशोक
गव्हाणे,भाऊसाहेब गिरे,मिथुन चौघुले,सादिक चौगुले,प्रदीप गव्हाणे,पिंटू
चौगुले,पिंटू गव्हाणे व आदि मान्यवर उपस्थित होते.
Thursday, January 3, 2019
Wednesday, January 2, 2019
दौंड तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी सचिन रणदिवे यांची नियुक्ती
दौंड तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी सचिन रणदिवे यांची नियुक्ती
प्रतिनिधी:दौंड तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी सचिन वाल्मिक रणदिवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आखील भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी,प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे,जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी दिलेल्या आदेशाचे वेळोवेळी पालन करून काँग्रेसचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहचवून पक्षवाढीस नेण्यास तसेच जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन म्हणून करण्याचे कार्य येत्या काळात जोमाने करणार असल्याचे मत यावेळी सचिन रणदिवे यांनी सांगितले.
Tuesday, January 1, 2019
चाकण येथे गोपाळ समाजहित महासंघाच्या भव्य महामेळाव्याचे आयोजन
चाकण येथे गोपाळ समाजहित महासंघाच्या भव्य
महामेळाव्याचे आयोजन
प्रतिनिधी:महाराष्ट्राची
सांस्कृतिक राजधानी व शैक्षणिक वारसा लाभलेले शहर शिक्षणाचे माहेरघर समाजसुधारक
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले
यांच्या कर्मभूमी पुणे येथील चाकण या ठिकाणी रविवार रोजी ता.6 जाने सकाळी १०.०० वा
गोपाळ समाजहित महासंघ पुणे जिल्हा आयोजित जीएसएम चाकण,राजगुरुनगर,खेड कामगार संघटना शाखा अनावरण व गोपाळ समाजाचा
भव्य महामेळावा होणार असून,सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आव्हान
यावेळी गोपाळ समाजहित महासंघ पश्चिम महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार
पवार यांनी केले.
तसेच या महामेळाव्यात गोपाळ
समाजहित महासंघाच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये
सन १९७३-७४ या सलग दोन वर्षात उप-महाराष्ट्र केसरी व सन १९७५ साली महाराष्ट्र
केसरीची गदा मिळवणारे त्याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्ण पदकाची कमाई
करून देणारे व महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते निवृत्त कॅपटन रघुनाथ
दादा पवार यांना जीवागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.नुकत्याच जालना येथे
पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ९७ किलो वजनी गटात अनिल ब्राह्मणे यांनी
कांस्य पदक पटकावले आहे त्याबद्दल त्यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार
आहे.समाजातील एक होतकरू गायिका विजयमाला वंजारी यांना “गाण सम्रादणी” म्हणून यावेळी
सन्मानित करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील प्रथम
होणारा राज्यस्तरीय महामेळाव्यास महाराष्ट्र राज्य,छत्तीसगड,मध्यप्रदेश व इतर
राज्यातून गोपाळ समाज बांधव उपस्थित राहणार असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले.यामध्ये
गोपाळ समाजाच्या विविध समस्यावर व भटक्या समाजासाठी स्थापन करण्यात आलेला “दादा विधाते आयोग” शिफारसी तात्काळ लागू करण्यात याव्यात या संबधित चर्चा
सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)