कुरकुंभ येथे हार्मोनिया ऑर्गनाईज कंपनीमध्ये कॉलमची गॅस किट फुटून अपघात
स्टायरिंग ऑक्सईडचे दूरच्या दूर लोट;लोकांमध्ये भीतीचे वातावरण !
कुरकुंभ प्रतिनिधी:(अलीम सय्यद) कुरकुंभ(ता.दौंड) येथील औद्योगिक वसाहतीतील हार्मोनिया ऑर्गनाईज लि. या कंपनीत स्टायरिंग ऑक्साईड या केमिकलचे प्रोडक्शन काढत असताना या केमिकलची वाफ जाण्यासाठी कॉलम (पाईप) चा वापर करतात या कॉलमची गॅस किट फुटून लिकीज झाल्याने पूर्ण परिसरात स्टायरिंग ऑक्साईड च्या गॅसचे लोट दिसत होते.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीची उभारणी १९८९ मध्ये झाली असून,कंपन्या आल्या की येथे उद्योग धंदे सुरू होऊन रोजगार उपलब्ध होतील बेरोजगार युवकांना कंपनीत कायम स्वरूपी नोकऱ्या मिळतील अशी शेतकऱ्यांची आशा होती.मात्र औद्योगिक वसाहततील जलवायू ध्वनी प्रदूषणाने परिसरातील १० किलोमीटर पर्यंतच्या नागरी वस्त्या बाधीत झाल्या आहेत.औद्योगिक वाहतीतील कंपन्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोणतेही निकष पाळत नाहीत.अशातच अशा दुर्घटना होत असल्याने याकडे वेळीच संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
कुरकुंभ औद्योगित वसाहतीत नव्वद टक्के कंपन्या विविध प्रकारचे केमिकल वर प्रक्रिया आणि उत्पादन केले जाते यामुळे कुरकुंभ औद्योगिक वसाहत ही केमिकल झोन म्हणून ओळखले जाते.दरम्यान रविवार (दि ०८ ) रोजी हा अपघात दुपारी अडीच च्या सुमारास झाला आहे.तसेच संबंधित कंपनी शेजारी अल्काईल अमाईन्स ही मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याने वेळीच स्टायरिंग ऑक्साईडच्या गॅसचे लोट अग्निशमनच्या तीन बंबाने वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला संबंधित कंपनी ही पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यालगत असल्याने कुरकुंभ तसेच मुकादमवाडी येथील नागरिकांनी स्टायरिंग ऑक्साईड चे लोट पाहण्यास कंपनीच्या गेट वर गर्दी केली होती.याचे लोट इतके भयंकर होते की सात की.मी वर मळदगावा पर्यंत याचे लोट दिसत होते.त्यामुळे काही काळ नागरिकांना मध्ये भितीचे वातावरण होते.नेमका हा प्रकार कशामुळे झाला याबद्दल कंपनी प्रशासन काहीच बोलायला तयार नव्हते.याचे लोट १ तासापर्यंत निघत असल्याने लोकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण होते.दरम्यान कुरकुंभ पोलीस मदत केंद्राच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करून या अपघातात कसलीही जीवित हानी झाली नसल्याचे यावेळी सांगितले.