Saturday, July 7, 2018

कुरकुंभ येथील हॉटेल आंनद गार्डन मध्ये चोरी ! अज्ञात चोरट्यां विरोधात कुरकुंभ पोलिस मदत केंद्रात गुन्हा दाखल


कुरकुंभ येथील हॉटेल आंनद गार्डन मध्ये चोरी !
अज्ञात चोरट्यां विरोधात कुरकुंभ पोलिस मदत केंद्रात गुन्हा दाखल

कुरकुंभ प्रतिनिधी : (अलीम सय्यद) कुरकुंभ ( ता.दौंड ) येथील कुरकुंभ  पांढरेवाडी रस्त्यालगत भोंगळेवस्ती जवळ असलेल्या  हॉटेल आंनद गार्डन मधुन पंधरा हजार तीनशे अकरा रुपयांचा मुद्देमाल  चोरी करून  हॉटेल मधील तीन वेटर कामगारांना   अज्ञात चार चोरट्यांनी  मारहाण करून चोरी केल्याची घटना ( दि. ७ जुलै ) रोजी पहाटे २:४५ च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गोपी चंद्रसिंह रावत वय ३२ सध्या रा. हाॅटेल आनंदगार्डन कुरकुंभ, मूळ रा. तुना, पो. सुमेपूर ता. जि. रुद्रप्रयाग, राज्य उत्तराखंड, यांनी अज्ञात चोरट्यां विरोधात कुरकुंभ पोलिस मदत केंद्रात फिर्याद दिली याबाबत अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
  दि ६ जुलै रोजी रात्री ११ वा चे सुमारास हॉटेल मॅनेजर अभिजित लाला भंडलकर (रा. कुरकुंभ ) यांनी हाॅटेल बंद केले होते. त्यानंतर जेवण करून फिर्यादी गोपी रावत व प्रमोदकुमार योगेंद्र मुखीया, विमलकुमार योगेंद्र मुखीया असे तिघे कामगार हाॅटेलमध्ये काउंटर जवळ झोपले होते. शनिवार (दि.७) रोजी पावणेतीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी  हाॅटेलच्या माघील असलेल्या खोलीचा पत्रा उचकटून खोलीचा लोखंडी दरवाज्याला आतून लावलेली कुलपाची कडी कटरने तोडून हाॅटेलमध्ये प्रवेश केला. यावेळी खडबड आवाज आल्याने फिर्यादी जागे झाले व इतर दोघांना झोपेतून उठवले असता समोर चार चोरटे उभे होते. अज्ञात चोरट्यांनी  विमलकुमार मुखीया यास तोंडावर डाव्या डोळ्यांवर पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली. पैसा किधर रखा है, असे म्हणत चोरट्यांनी तिघांना लोखंडी वरगाळे, पाईपने, पाठीत व इतर ठिकाणी मारहाण केली. यानंतर काउंटरच्या ड्रावरमधील रोख रक्कम,  पैशाचे पाकिट, दारूच्या बाटल्या , मोबाईल फोन, सॅक बॅग, असे मिळून एकूण १५ हजार ३११ रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्यादीत म्हंटले आहे.  याप्रकरणी पुढील तपास कुरकुंभ पोलिस करीत आहे.