Sunday, July 15, 2018

नानगाव मधील ४ शेतीपंप गेले चोरीला !

















नानगाव मधील ४ शेतीपंपातील तांब्याच्या तारा चोरांनी केल्या गायब !

डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी:भीमा नदीच्या तीरावरील असणार्या शेतकऱ्यांच्या ४ शेती पंप मोटारीतील अज्ञात चोरट्यांनी तांब्याच्या तारा चोरी केल्या आहेत.शेतीपंपात असणारी तांब्याची तार,विद्युत साहित्य,चुंबकीय आवरण ई किमतीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.दि.१४ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास या चोरट्यांनी शेजारील उसाच्या शेतात मोटारीतील साहित्य खोलून व्यवस्थित पणे विल्हेवाट लावलेली दिसून आली आहे.शेतकरी बापू शंकर गुंड हे सकाळी दि.१५ जुलै रोजी शेतात फेरफटका मारण्यास गेले असल्यास त्यांना हि सर्व बाब निदर्शनास आली.त्यावेळी त्यांनी शेजारील शंकर नारयण गुंड व इतर दोन शेतकऱ्यांस संपर्क करून हि माहिती दिली.
या पूर्वीही अश्याच प्रकारे इतर शेतकर्यांचे शेती पंप चोरीला गेले आहेत.सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून,आधीच शेती मालाला भाव नसून शेतकरी अडचणीत आहे.त्यात या शेती पंपाच्या चोरी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन शेतकरी राजा अडचणीत येत आहे.यावर पोलीस प्रशासनाने जातीने लक्ष घालून या चोऱ्यांच्या मुसक्या आवळल्या तर शेतकरी राजाचे भले होईल असे यावेळी शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.