Sunday, July 29, 2018
Friday, July 27, 2018
Thursday, July 26, 2018
Wednesday, July 25, 2018
Monday, July 23, 2018
Sunday, July 22, 2018
Saturday, July 21, 2018
Thursday, July 19, 2018
नानगाव येथे आण्णा भाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी
नानगाव येथे आण्णा भाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी !
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी :ता.१८ जुलै २०१८
नानगाव ता.दौंड ग्रामपंचायत येथे आण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. पंचायत समिती दौंड सदस्य सयाजी ताकवणे यांच्या हस्ते आण्णाभाऊ साठे यांच्या फोटोला पुष्पहार घालण्यात आला.पुण्यतिथी निमित्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.यावेळी सयाजी ताकवणे,सी. बी. खळदकर,विकास खळदकर,माणिक आढागळे व विष्णू खराडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
Wednesday, July 18, 2018
Tuesday, July 17, 2018
Monday, July 16, 2018
Sunday, July 15, 2018
नानगाव मधील ४ शेतीपंप गेले चोरीला !
नानगाव मधील ४ शेतीपंपातील तांब्याच्या तारा चोरांनी केल्या गायब !
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी:भीमा नदीच्या तीरावरील असणार्या शेतकऱ्यांच्या ४ शेती पंप मोटारीतील अज्ञात चोरट्यांनी तांब्याच्या तारा चोरी केल्या आहेत.शेतीपंपात असणारी तांब्याची तार,विद्युत साहित्य,चुंबकीय आवरण ई किमतीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.दि.१४ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास या चोरट्यांनी शेजारील उसाच्या शेतात मोटारीतील साहित्य खोलून व्यवस्थित पणे विल्हेवाट लावलेली दिसून आली आहे.शेतकरी बापू शंकर गुंड हे सकाळी दि.१५ जुलै रोजी शेतात फेरफटका मारण्यास गेले असल्यास त्यांना हि सर्व बाब निदर्शनास आली.त्यावेळी त्यांनी शेजारील शंकर नारयण गुंड व इतर दोन शेतकऱ्यांस संपर्क करून हि माहिती दिली.
या पूर्वीही अश्याच प्रकारे इतर शेतकर्यांचे शेती पंप चोरीला गेले आहेत.सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून,आधीच शेती मालाला भाव नसून शेतकरी अडचणीत आहे.त्यात या शेती पंपाच्या चोरी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन शेतकरी राजा अडचणीत येत आहे.यावर पोलीस प्रशासनाने जातीने लक्ष घालून या चोऱ्यांच्या मुसक्या आवळल्या तर शेतकरी राजाचे भले होईल असे यावेळी शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
Friday, July 13, 2018
Wednesday, July 11, 2018
Tuesday, July 10, 2018
Monday, July 9, 2018
Sunday, July 8, 2018
कुरकुंभ येथे हार्मोनिया ऑर्गनाईज कंपनीमध्ये कॉलमची गॅस किट फुटून अपघात
कुरकुंभ येथे हार्मोनिया ऑर्गनाईज कंपनीमध्ये कॉलमची गॅस किट फुटून अपघात
स्टायरिंग ऑक्सईडचे दूरच्या दूर लोट;लोकांमध्ये भीतीचे वातावरण !
कुरकुंभ प्रतिनिधी:(अलीम सय्यद) कुरकुंभ(ता.दौंड) येथील औद्योगिक वसाहतीतील हार्मोनिया ऑर्गनाईज लि. या कंपनीत स्टायरिंग ऑक्साईड या केमिकलचे प्रोडक्शन काढत असताना या केमिकलची वाफ जाण्यासाठी कॉलम (पाईप) चा वापर करतात या कॉलमची गॅस किट फुटून लिकीज झाल्याने पूर्ण परिसरात स्टायरिंग ऑक्साईड च्या गॅसचे लोट दिसत होते.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीची उभारणी १९८९ मध्ये झाली असून,कंपन्या आल्या की येथे उद्योग धंदे सुरू होऊन रोजगार उपलब्ध होतील बेरोजगार युवकांना कंपनीत कायम स्वरूपी नोकऱ्या मिळतील अशी शेतकऱ्यांची आशा होती.मात्र औद्योगिक वसाहततील जलवायू ध्वनी प्रदूषणाने परिसरातील १० किलोमीटर पर्यंतच्या नागरी वस्त्या बाधीत झाल्या आहेत.औद्योगिक वाहतीतील कंपन्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोणतेही निकष पाळत नाहीत.अशातच अशा दुर्घटना होत असल्याने याकडे वेळीच संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
कुरकुंभ औद्योगित वसाहतीत नव्वद टक्के कंपन्या विविध प्रकारचे केमिकल वर प्रक्रिया आणि उत्पादन केले जाते यामुळे कुरकुंभ औद्योगिक वसाहत ही केमिकल झोन म्हणून ओळखले जाते.दरम्यान रविवार (दि ०८ ) रोजी हा अपघात दुपारी अडीच च्या सुमारास झाला आहे.तसेच संबंधित कंपनी शेजारी अल्काईल अमाईन्स ही मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याने वेळीच स्टायरिंग ऑक्साईडच्या गॅसचे लोट अग्निशमनच्या तीन बंबाने वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला संबंधित कंपनी ही पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यालगत असल्याने कुरकुंभ तसेच मुकादमवाडी येथील नागरिकांनी स्टायरिंग ऑक्साईड चे लोट पाहण्यास कंपनीच्या गेट वर गर्दी केली होती.याचे लोट इतके भयंकर होते की सात की.मी वर मळदगावा पर्यंत याचे लोट दिसत होते.त्यामुळे काही काळ नागरिकांना मध्ये भितीचे वातावरण होते.नेमका हा प्रकार कशामुळे झाला याबद्दल कंपनी प्रशासन काहीच बोलायला तयार नव्हते.याचे लोट १ तासापर्यंत निघत असल्याने लोकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण होते.दरम्यान कुरकुंभ पोलीस मदत केंद्राच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करून या अपघातात कसलीही जीवित हानी झाली नसल्याचे यावेळी सांगितले.
Saturday, July 7, 2018
कुरकुंभ येथील हॉटेल आंनद गार्डन मध्ये चोरी ! अज्ञात चोरट्यां विरोधात कुरकुंभ पोलिस मदत केंद्रात गुन्हा दाखल
कुरकुंभ येथील हॉटेल आंनद गार्डन मध्ये चोरी !
अज्ञात चोरट्यां विरोधात कुरकुंभ पोलिस मदत केंद्रात गुन्हा दाखल
कुरकुंभ प्रतिनिधी : (अलीम सय्यद) कुरकुंभ ( ता.दौंड ) येथील कुरकुंभ पांढरेवाडी रस्त्यालगत भोंगळेवस्ती जवळ असलेल्या हॉटेल आंनद गार्डन मधुन पंधरा हजार तीनशे अकरा रुपयांचा मुद्देमाल चोरी करून हॉटेल मधील तीन वेटर कामगारांना अज्ञात चार चोरट्यांनी मारहाण करून चोरी केल्याची घटना ( दि. ७ जुलै ) रोजी पहाटे २:४५ च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गोपी चंद्रसिंह रावत वय ३२ सध्या रा. हाॅटेल आनंदगार्डन कुरकुंभ, मूळ रा. तुना, पो. सुमेपूर ता. जि. रुद्रप्रयाग, राज्य उत्तराखंड, यांनी अज्ञात चोरट्यां विरोधात कुरकुंभ पोलिस मदत केंद्रात फिर्याद दिली याबाबत अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि ६ जुलै रोजी रात्री ११ वा चे सुमारास हॉटेल मॅनेजर अभिजित लाला भंडलकर (रा. कुरकुंभ ) यांनी हाॅटेल बंद केले होते. त्यानंतर जेवण करून फिर्यादी गोपी रावत व प्रमोदकुमार योगेंद्र मुखीया, विमलकुमार योगेंद्र मुखीया असे तिघे कामगार हाॅटेलमध्ये काउंटर जवळ झोपले होते. शनिवार (दि.७) रोजी पावणेतीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हाॅटेलच्या माघील असलेल्या खोलीचा पत्रा उचकटून खोलीचा लोखंडी दरवाज्याला आतून लावलेली कुलपाची कडी कटरने तोडून हाॅटेलमध्ये प्रवेश केला. यावेळी खडबड आवाज आल्याने फिर्यादी जागे झाले व इतर दोघांना झोपेतून उठवले असता समोर चार चोरटे उभे होते. अज्ञात चोरट्यांनी विमलकुमार मुखीया यास तोंडावर डाव्या डोळ्यांवर पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली. पैसा किधर रखा है, असे म्हणत चोरट्यांनी तिघांना लोखंडी वरगाळे, पाईपने, पाठीत व इतर ठिकाणी मारहाण केली. यानंतर काउंटरच्या ड्रावरमधील रोख रक्कम, पैशाचे पाकिट, दारूच्या बाटल्या , मोबाईल फोन, सॅक बॅग, असे मिळून एकूण १५ हजार ३११ रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी पुढील तपास कुरकुंभ पोलिस करीत आहे.
Tuesday, July 3, 2018
Subscribe to:
Posts (Atom)