यवतच्या यात्रेत जंगी आखाड्याचे आयोजन..
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी
यवत येथे दरवर्षी जंगी आखाडा भरतो. पुणे, कोल्हापूर येथे तालीम करणाऱ्या स्थानिक मल्लांसोबतच पंजाब, हरयाणासारख्या परप्रांतातून व राज्याच्या विविध जिल्ह्यातून येथे मल्ल येत असतात. समाधानकारक इनाम मिळत असल्याने येथे मल्लांची मोठी गर्दी असते. शेवटच्या कुस्तीचे इनाम हे या आखाड्याचे एक वैशिष्ट आहे. वर्षगणीक वाढणारा हा आकडा या वर्षी एक लाख एकतीस हजार रूपयांवर गेला होता. जुबेर पिरजादे व गोरख पवार ही मानाच्या कुस्तीगटातील कुस्ती बरोबरीत सुटली असली तरी आखाड्यात गाळलेला घाम आणि त्यांनी केलेल्या डाव प्रतिडावाने लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
आखेरच्या मानाच्या सात कुस्त्यांमध्ये जुबेर पिरजादे विरूद्ध गोरख पवार, मंगेश दोरगे विरूद्ध विजय कोकरे, शंकर माने विरूद्ध ऋषिकेश भांडे, अनिल ब्राम्हणे विरूद्ध प्रताप हेगडे, सागर मोहोळ विरूद्ध नागेश माने, तुषार डूबे विरूद्ध अक्षय गरूड आणि शेवटी सागर बिराजदार विरूद्ध शिवराज राक्षे यांचा समावेश होता. कुस्ती समालोचक प्रशांत भागवत यांच्या समालोचनामुळे कुस्त्यांचा खरा आनंद उपस्थीतांना घेता आला. सदानंद दोरगे, श्रीपती दोरगे, सतीश दोरगे, बबन दोरगे, दत्तात्रय दोरगे, शंकर दोरगे यांनी पच म्हणून काम पाहिले.
शेवटचा मान तीघांना
य़वतच्या आखाड्यात नामांकीतांची संख्या मोठी असते. त्यामुळे अखेरच्या काही कुस्त्याना मानाच्या कुस्त्या म्हणन्याचा प्रघात पडला आहे. शेवटच्या तीन कुस्त्या अशा मानाने झालेली ही सुरूवात आता सातवर पोहोचली आहे. या वर्षी मात्र जाहीर होऊनही सागर बिराजदार आखाड्यात न आल्याने तुषार डुबे आणि अक्षय गरूड यांच्या कुस्तीला शेवटचा मान देऊन शिवराज राक्षेसह तो तिघांमध्ये वाटून देण्यात आला.
यावेळी
यात्रा कमीटी अध्यक्ष शंकरराव दोरगे,सतिश दोरगे,श्रीपतराव दोरगे,सदानंद दोरगे,केडी विनायक(दादा) दोरगे,दत्तात्रय दोरगे,पंचाची भुमीका बजावली,तर पैलवानांना इनाम देन्याचे काम कैलास दोरगे, कुंडलिक खुटवड,पंडीतभाऊ दोरगे नानासाहेब दोरगे,खंडु दोरगे ,सदाशिव दोरगे,गणेश कदम जि प सदस्य, भाऊसाहेब दोरगे,अशोक दोरगे,चंद्रकांत दोरगे,लक्ष्मण दोरगे,दशरथ खुटवड.संजय दोरगे,रमेश जैन यांनी केले
तसेच बाळासाहे सापळे व सापळे. कुटुबियांनी कुस्ती आखाड्यात खोदाइ व दुरूस्तिचा मान असतो विज मंडळाच्या सहकार्याने गावात सर्वत्रलखलखाट पाहायला मिळाला.