डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी : धनगर समाज आरक्षणासाठी दौंड तालुक्यातील पाटस येथे सकल धनगर समाजाच्या वतीने दि. २० रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती मेळाव्याच्या आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
धनगर समाज आरक्षणाची मागणी गेली अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने राज्यभर अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. परंतु या प्रश्नावर समाधानकारक तोडगा निघाला नाही. पाटस येथे धनगर समाजाच्या वतींने अखेरचा लढा म्हणुन पाटस येथे आरक्षण मिळावे यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे.
‘धनगर समाज आरक्षणासाठी अखेरचा लढा’ ‘ना गट ना पक्ष, धनगर आरक्षण हेच लक्ष’ अशा आशयाचे पोस्टर्स आयोजकांनी लावले आहेत. त्यामुळे या मेळाव्यात आरक्षणाबाबत महत्वाची दिशा ठरेल .असे आयोजकांनी सांगितले.
या मेळाव्यात धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आणि उत्तम जानकर हे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात पुणे जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या मेळाव्यात गोपीचंद पडळकर धनगर समाज आरक्षणा बाबत काय भूमिका मांडणार याबाबत तालुक्यातील नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे.