सुनील थोरात यांना मणीरत्न गौरव पुरस्कार 2018 प्रदान ..!
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी: मांडवगण फराटा
येथील वाघेश्वर विद्याधाम प्रशालेतील उप-मुख्याध्यापक सुनील थोरात यांना पद्मश्री
डॉ.मनिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट,उरुळी कांचन
यांच्या वतीने देण्यात येणारा शैक्षणिक क्षेत्रातील राज्यस्तरीय मणीरत्न पुरस्कार
प्रदान करण्यात आला.
थोरात हे इंग्रजी विषयाचे तज्ञ अध्यापक असून
सुमारे २४ वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यी क्षेत्रातील
विविधांगी भरीव कामगीरी बद्दल त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.पुणे
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रसेवा
समितीचे प्रमुख शिक्षण तज्ञ,प्रवचनकार व
ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.रवींद्र भोळे यांच्या शुभहस्ते व डॉ.अशोक के पाटील(उपाध्यक्ष
म.दे.मा.ट्रस्ट),
डॉ.माधवी रायते(डीन),दै.केसरी चे उपसंपादक स्वप्नील कुलकर्णी, दै.लोकसत्ताचे उपसंपादक मिलिंद ढमढेरे,कर्नल अरविंद जोगळेकर,लेखक शरद अत्रे व अशोक शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत
सदर पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी शिरूर
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुकुमार बोरा,उपाध्यक्ष चंद्रकांतजी बाफना, शालेय समितीचे
अध्यक्ष चंदूलालजी चोरडीया,
संस्थेचे सचिव गुरुवर्य तू.म.परदेशी, प्राचार्य एस.टी.गद्रे,प्रशालेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग,मांडवगण फराटा ग्रामस्थ व पालक वर्ग यांच्या
वतीने सुनील थोरात यांचे विशेष अभिनंदन केले.