Monday, November 26, 2018

डि न्युज लाईव्हचे संपादक सचिन रुपनवर यांची म.रा राज्य दलित पँथरच्या प्रव...

सा.दौंड एक्स्प्रेस व डि न्युज लाईव्ह वृत्तवाहिनीचे संपादक सचिन रुपनवर यांची महाराष्ट्र राज्य दलित पँथरच्या प्रववक्ते पदी नियुक्ती

सा.दौंड एक्स्प्रेस व डि न्युज लाईव्ह वृत्तवाहिनीचे संपादक सचिन रुपनवर यांची महाराष्ट्र राज्य दलित पँथरच्या प्रववक्ते पदी नियुक्ती

डी न्यूज प्रतिनिधी: साप्ताहिक दौंड एक्स्प्रेस व डि न्युज लाईव्ह वेब वाहिनीचे संपादक सचिन रुपनवर यांची महाराष्ट्र राज्य दलित पँथर च्या प्रव्क्ते पदी नियुक्ती करण्यात आली ,   दलित पँथरचे  केंद्रीय कार्याध्याक्ष अशोकजी माने यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले,तर  बारामती महिला शहर अध्यक्ष पदी पुनम सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली, यावेळी दलित पँथरचे पदाधिकारी उपस्थितीत  होते,

Sunday, November 18, 2018

मार्बल फरशी चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला यवत पोलिसांनी केले जेरबंद !!


डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी:_दौंड तालुक्यातील नांदूर येथील मिराज सिरामिक्स टाईल्स कंपनीमध्ये कंपनीच्या स्विकृटीगार्डच्या मदतीने (दि.१५) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास १७ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे २ हजार मार्बल फरशी बॉक्स टेम्पोमधून चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला यवत पोलिसांनी स्थानिक ग्रामसुरक्षा दल मित्रांच्या मदतीने जेरबंद केले आहे. इतर सात आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले असून यातील पसार झालेले बहुतेक आरोपी स्थानिक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना दौंड न्यायालयाने (दि.२२) नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे यांनी दिली.

या प्रकरणी धीरेंद्रकुमार जाट (वय १९), प्रदीपकुमार दयाल (वय ३०), कुलदीप चाक (वय ३०), पवनकुमार शर्मा (वय २१), आकाश कुमार रॉय (वय २४ वर्षे सर्व मूळ रा. उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. तर या चोरी प्रकरणी कंपनीचे मालक श्रीकांत सुधीर खाडिलकर (वय ५१ वर्षे रा. मुलुंड, मुंबई) यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि.१५) रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास नांदूर गावच्या हद्दीत असलेल्या मिराज सिरामिक्स या टाईल्स कंपनी मधील गोडाऊन मधून टाईल्स फरशीची चोरी करण्यात येत असल्याबाबतची माहिती यवत पोलिसांना खबऱ्या मार्फत मिळाली. त्यानुसार रात्रीच्या सुमारास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे, सहाय्यक फौजदार परशुराम पिलाणे, विनोद रासकर, अजित काळे यांचे पोलीस पथक या कंपनीत गेले. यावेळी या स्टाईल फरशीच्या कंपनीत बारा आरोपी टेम्पो क्रमांक (एमएच ४२ एक्यु २१६९) मध्ये १ लाख ७५ हजार किंमतीचे १७० फरशी बॉक्स चोरून नेहण्याच्या उद्देशाने भरत असताना पोलीस पथकाला आढळले. यावेळी या पोलीस पथकाला पाहून सात आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले तर पोलिसांनी स्थानिक ग्राम सुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पाच आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. पोलिसांनी मार्बल फरशीसह टेम्पो ताब्यात घेतला आहे. या आरोपींनी गेल्या वीस दिवसात या चोरी व्यतिरिक्त १६ लाख रुपयांचे १ हजार ८३० टाईल्स बॉक्स चोरुन नेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या चोरी प्रकरणात स्थानिकांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे करीत आहेत.

Monday, November 5, 2018

दौंड | दापोडीत बिबट्याचा ९ जणावर जीवघेणा हल्ला !

सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा - शरद सूर्यवंशी(शिवसेना,पुणे जिल्हा ...

सुनील थोरात यांना मणीरत्न गौरव पुरस्कार 2018 प्रदान ..!


सुनील थोरात यांना मणीरत्न गौरव पुरस्कार 2018 प्रदान ..!
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी: मांडवगण फराटा येथील वाघेश्वर विद्याधाम प्रशालेतील उप-मुख्याध्यापक सुनील थोरात यांना पद्मश्री डॉ.मनिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट,उरुळी कांचन यांच्या वतीने देण्यात येणारा शैक्षणिक क्षेत्रातील राज्यस्तरीय मणीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
      थोरात हे इंग्रजी विषयाचे तज्ञ अध्यापक असून सुमारे २४ वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यी क्षेत्रातील विविधांगी भरीव कामगीरी बद्दल त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रसेवा समितीचे प्रमुख शिक्षण तज्ञ,प्रवचनकार व ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.रवींद्र भोळे यांच्या शुभहस्ते व डॉ.अशोक के पाटील(उपाध्यक्ष म.दे.मा.ट्रस्ट), डॉ.माधवी रायते(डीन),दै.केसरी चे उपसंपादक स्वप्नील कुलकर्णी, दै.लोकसत्ताचे उपसंपादक मिलिंद ढमढेरे,कर्नल अरविंद जोगळेकर,लेखक शरद अत्रे  व अशोक शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार देण्यात आला.
       याप्रसंगी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुकुमार बोरा,उपाध्यक्ष चंद्रकांतजी बाफना, शालेय समितीचे अध्यक्ष चंदूलालजी चोरडीया, संस्थेचे सचिव गुरुवर्य तू.म.परदेशी, प्राचार्य एस.टी.गद्रे,प्रशालेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग,मांडवगण फराटा ग्रामस्थ व पालक वर्ग यांच्या वतीने सुनील थोरात यांचे विशेष अभिनंदन केले.

मनपूर्वक सर्वाना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा - संपत फडके(उपाध्यक्ष,कॉंग...

सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा - गणेश आखाडे(अध्यक्ष,भाजपा.दौंड तालुका)