Thursday, August 23, 2018

नानगावच्या उपसरपंच पदी शारदा खळदकर !

           नानगावच्या उपसरपंच पदी शारदा खळदकर !

नानगावच्या उपसरपंच पदी शारदा खळदकर !
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी:ता.२३ऑगस्ट २०१८
दौंड तालुक्यातील नानगाव ग्रामपंचायत येथे आज (ता.२३ऑग) रोजी उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली होती.यादरम्यान नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे,छाननी, माघार घेणे या सर्व प्रक्रिया पूर्ण केली असता यामध्ये फक्त एकच अर्ज आला होता.शारदा दादासो खळदकर यांची सर्वानुमते बिनविरोध उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून पोपट शेलार ग्रामविकास अधिकारी यांनी काम पाहिले.

माजी पंतप्रधान कै.अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा असल्या कारणाने मिरवणूक ,गुलालाची उधळण हे टाळून फक्त एक नारळ देऊन नवनियुक्त उपसरपंच यांचे अभिनंदन करण्यात आले.