Monday, August 20, 2018

नानगावच्या ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा !



नानगावच्या ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा !

डी न्यूज लाइव्ह प्रतिनिधी:ता.२१ ऑगस्ट २०१८
नानगाव ता.दौंड येथे सोमवार(ता.२० ऑग) रोजी भैरवनाथ मंदिरात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नानगाव मधील ग्रामस्थ उपस्थित होते.
भारत देशाचे माजी पंतप्रधान कै.अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करून ग्रामसभेस सुरुवात करण्यात आली.
नानगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी पोपट शेलार यांनी मागील ग्रामसभेचे प्रोसेडिंग वाचून १ ते ७ विषयी अजेंठा वरील विषय मार्गी लावले.गावातील सामाजिक कार्यकर्ते विष्णू खराडे यांनी १४ व्या वित्त आयोगातील विकास आराखड्याची मागणी केली.त्या दरम्यान ग्रामविकास अधिकारी यांनी सन २०१६-२०१७ मधील एकूण २५ लाख रुपयांची व २०१७-२०१८ मधील २९ लाख ७५ हजार १९१ रुपयांची विकास आराखड्याचे इतिवृत्त सादर केले.आरोग्य विभाग,आरो प्लांट,अंगणवाडी दुरुस्ती,समाज मंदिर,व्यवसायिक प्रशिक्षण,महिला बालकल्याण विभाग,सोलर स्ट्रीट लाईट,व्यायाम शाळा,मशीद अशा ई विकास कामासंदर्भात १४व्या वित्त आयोगातून मंजुरी मिळाली आहे व नियोजित कामास सुरुवात करण्यात आली आहे असे इतिवृत्त वाचून सर्वांसमोर सादर केले.
ऐनवेळीच्या विषयात संजय शेलार यांनी सांगितले की,नानगाव हे ५००० हजार लोकसंख्येचे वरती असून,ग्रामविकास अधिकारी व गावकामगर तलाठी हे स्वतंत्र असावे.सद्य परिस्थिती दोन्हीही अधिकारी अतिरिक्त गावांचा पदभार सांभाळत आहे.त्यामुळे नानगाव मधील नागरिकांना दाखले व इतर कामासाठी ताटकळत बसावे लागत आहे.अन्यथा आम्हाला हे अधिकारीच नकोत दुसरे स्वतंत्र अधिकारी मिळावेत अशा प्रकारचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात यावा असे त्यांनी सांगितले.माजी दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विशाल शेलार यांनी ग्रामस्थांना विनवणी केली की,दर शनिवारी नव्याने सुरू झालेला आठवडे बाजाराला सर्वांनी सहकार्य करावे .त्यामुळेच आपल्याला ग्रामदैवत असलेल्या रासाई देवीसाठी तीर्थस्थान म्हणून 'क' दर्जाचे स्थान मिळण्यासाठी मदत मिळेल.
पूर्वीचे तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय गुंड यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपला असून,सर्वानुमते नवनियुक्त 

संजय गोविंद रासकर 
यांची एक वर्षासाठी 
तंटामुक्ती अध्यक्ष 
म्हणून निवड 
करण्यात आली.

प्राथमिक केंद्रातील 
वैद्यकीय अधिकारी 
टी. आर.बनसोडे 
यांनी १० वर्ष अविरतपणे
 सेवा दिली त्याबद्दल त्यांचे 
सर्वानुमते अभिनंदन करण्यात आले.