मी कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करणार - रमेश थोरात
दौंड, ता.२७ : दौंड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा उमदेवारी अर्ज माझ्या दौंड तालुक्यातील कार्यकर्त्यांसह सोमवार दि.२८ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे अशी माहिती दि.२७ रोजी चौफुला ता.दौंड येथील पत्रकार परिषदेत दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी दिली.
दौंड तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या राजकीय घडामोडीना वेग आला आहे. निवडणुकीचे बिगुल वाजले आहे, अनेकांनी रणशिंग फुंकले आहे.
थोरात म्हणाले, गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटी नंतर भाजप सोबत गेलो परंतु लोकसभा निवडणूक व एक वर्षाचा भाजप सोबतचा अनुभव अतिशय वाईट आहे. माझी भाजपसोबत जाऊन मोठी चूक झाली, मी राष्ट्रवादी कॉग्रेस
शरदचंद्र पवार पक्ष या पवार साहेबांच्या व खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर कायम स्वरूपी एकनिष्ठतेने काम करणार आहे. मी पवार साहेबांकडे पक्षाची उमेदवारी मागितली आहे. मला दौंड विधानसभेची पक्षाची उमेदवारी मिळण्याची खात्री आहे. या पुढील काळात मी पवार साहेबांच्या धेय्य धोरणाप्रमाणे पक्षवाढीसाठी शरद पवार व सुप्रिया सुळे यांचे हात बळकट करण्यासाठी येथून पुढील काळात काम करणार आहे असे थोरात यांनी सांगितले. यावेळी रामभाऊ चौधरी, राहुल दिवेकर, दिलीप हंडाळ, हर्षल शेळके,सचिन शेलार आदी उपस्थित होते.