Sunday, October 27, 2024

मी कार्यकर्त्यांसह उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार - रमेश थोरात

मी कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करणार - रमेश थोरात

दौंड, ता.२७ : दौंड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा उमदेवारी अर्ज माझ्या दौंड तालुक्यातील कार्यकर्त्यांसह सोमवार दि.२८ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे अशी माहिती दि.२७ रोजी चौफुला ता.दौंड येथील पत्रकार परिषदेत दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी दिली.

दौंड तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या राजकीय घडामोडीना वेग आला आहे. निवडणुकीचे बिगुल वाजले आहे, अनेकांनी रणशिंग फुंकले आहे.

थोरात म्हणाले, गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटी नंतर भाजप सोबत गेलो परंतु लोकसभा निवडणूक व एक वर्षाचा भाजप सोबतचा अनुभव अतिशय वाईट आहे. माझी भाजपसोबत जाऊन मोठी चूक झाली, मी राष्ट्रवादी कॉग्रेस
शरदचंद्र पवार पक्ष या पवार साहेबांच्या व खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर कायम स्वरूपी एकनिष्ठतेने काम करणार आहे. मी पवार साहेबांकडे पक्षाची उमेदवारी मागितली आहे. मला दौंड विधानसभेची पक्षाची उमेदवारी मिळण्याची खात्री आहे. या पुढील काळात मी पवार साहेबांच्या धेय्य धोरणाप्रमाणे पक्षवाढीसाठी शरद पवार व सुप्रिया सुळे यांचे हात बळकट करण्यासाठी येथून पुढील काळात काम करणार आहे असे थोरात यांनी सांगितले. यावेळी रामभाऊ चौधरी, राहुल दिवेकर, दिलीप हंडाळ, हर्षल शेळके,सचिन शेलार आदी उपस्थित होते.

Monday, October 21, 2024

दौंड तालुक्यात महादेव जानकर कुणाला देणार धोबीपछाड?

दौंड तालुक्यात महादेव जानकर कुणाला देणार धोबीपछाड?

कार्यकर्त्यांना हात लावाल तर जशाच तसे उत्तर देऊ -  महादेव जानकर 

दौंड, ता. २१ : दौंड तालुक्यातील पाटस येथे दि.२१ रोजी राष्ट्रीय समाज पक्ष, रयत शेतकरी संघटना व दौंड जनक्रांतीच्या वतीने कार्यकर्ता निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष घटक पक्षांना संपवत राजकारण करत असून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सक्षम उमेदवार देणार असल्याचे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केले. 

महादेव जानकर म्हणाले की, दौंड जनक्रांती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत शिंदे व रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांनी ठरवून तालुक्याला योग्य उमेदवार द्यावा अशा प्रकारचे सुतोवाच यावेळी करण्यात आले. दौंडकरांनी माझ्यावरती मोठ्या प्रमाणावर प्रेम केलं असून मला खासदारकीच्या निवडणुकीमध्ये विजयी केले. तसेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही माझ्या उमेदवाराला मतदान केले होते, तुमच्या सुख दुःखात मी येऊ शकलो नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकटावरती काही जण विजय झाले मात्र त्यांनी तालुक्यातील जनतेचा, समाजाचा पक्षाचा घात केला आहे. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये परिवर्तन करण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले. दौंडकरानी मला कधीतरी बोलावले तरी मी या दौंड तालुक्यामध्ये येणार असून, राज्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे दौडसह किमान १५ आमदार विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सध्या दौंडमध्ये दबावाचे राजकारण सुरू असून, कार्यकर्त्यावर अन्याय जर कोणी करत असेल तर त्याला       यावेळी बोलताना रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख म्हणाले की, तालुक्यामध्ये सत्तेचा गैरवापर सुरू असून विनाकारण लोकांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. पैलवानाला वस्ताद मोठा करतो त़ोच पहिलवान वस्तादाला पाडायचा प्रयत्न करतो मात्र पहिलवान किती जरी मोठा झाला तरी वस्ताद एक डाव राखून ठेवतो हाच डाव वस्ताद महादेव जानकर यंदा टाकतील आणि दौडमध्ये परीवर्तन करतील असे म्हणताच उपस्थितांनी जोरदार टाळ्या व शिट्ट्या वाजवत त्याना प्रतिसाद दिला.

दौंड जनक्रांती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ऍड.यशवंत शिंदे म्हणाले की, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर हे त्यागी नेतृत्व असून त्यांनी अनेक नेत्यांना घडवण्याची काम केलेले आहे. मात्र काहींनी गद्दारी केली जनता त्यांचा निर्णय घेईल. विविध उपेक्षित समाजावर सातत्याने अन्याय होत असून, या विरोधात एकत्र येण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

याप्रसंगी महादेव जानकर अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, काशिनाथ शेवते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, ज्ञानेश्वर सलगर मुख्य महासचिव रासपा, बापूसाहेब देशमुख अध्यक्ष रयत शेतकरी संघटना, ॲड.यशवंत (नाना) शिंदे दौंड जनक्रांती प्रमुख, विनायक रुपनवर पुणे जिल्हाध्यक्ष, तात्यासाहेब ताम्हाणे, घनश्याम हाके, शिवाजी कुऱ्हाडे, दादासो भिसे तालुकाध्यक्ष रासपा आदी मान्यवर उपस्थित होते.