Tuesday, April 7, 2020

नानगाव येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक !



पारगाव प्रतिनिधी : ता.०७ एप्रिल २०२०

नानगाव(गणेशरोड) ता.दौंड येथे गुरुवार (०२ एप्रिल) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागून हातवळण एजी लाईन तारांचे घर्षण होऊन २० एकर पैकी १३ एकर ऊस जळून खाक झाला आहे अशी माहिती शेतकरी ज्ञानदेव काळे यांनी दिली आहे.

धुराचे प्रचंड लोट सुरू झाल्याने गावातील लोकांनी जळणाऱ्या उसाकडे धाव घेतली.आगीचा वेग जोरात असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही.
या दोन्ही शेतकऱ्यांचे लोखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या आधीही येथील अनेक शेतकऱ्यांचे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक झाले आहे.अस्मानी संकटांबरोबरच महावितरणचे सुलतानी संकट कोसळल्याने शेतकरी हताश झाला आहे. या परिसरातील शिवारातून महावितरणचे विजेचे खांब टाकण्यात आले आहेत. मात्र, महावितरणकडून योग्य देखभाल केली जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी तारांमध्ये अंतर कमी होऊन घर्षण होते.अशाच प्रकारे शॉर्टसर्किट होऊन ऊस जळण्याच्या घटना होत आहेत.
पाण्याची कमतरता असताना कसेबसे जगवलेले उसाचे पीक एन तोडणीस आले असताना विजेच्या शॉर्टसर्किटमुळे डोळ्यादेखत जाळून खाक झाले आहे. कोरोना व्हायरसमुळे सध्या सगळीकडे संचारबंदी लागू आहे.याचदरम्यान बाजारपेठा हतबल झाल्या आहेत.शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.पारगाव सबस्टेशन कनिष्ठ अभियंता पी.एन. पिसाळ यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.दुष्काळ सदृश परिस्थितीसमोर असताना या ओढवलेल्या संकटांमुळे सरकारकडून नुकसानग्रस्थ शेतकऱ्यांनकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.

Monday, April 6, 2020

खडकी व दापोडी येथील शाळेत पोषण आहार वाटप !


दौंड प्रतिनिधी : ता.०६ एप्रिल २०२०
दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खडकी व दापोडी येथे शालेय पोषण आहाराचे इयत्ता १ली ते ७वी चे एकूण ४३५ मुले-मुली यांचा पोषण आहाराचे वाटप पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश नवले,सचिन काळभोर,पोलिस पाटिल संदीप काळे,रमेश सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वाहन सौजन्य खडकी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले.या वाटपासाठी काल आपल्या शाळा व्यस्थापन समिती मधील अध्यक्ष शब्बीर पठाण,उपाध्यक्षा सोनाली मोहीते तसेच रत्नमाला शेजाळ, निलिमा काळभोर, बाळासाहेब गुणवरे, श्रीकांत काळे, संतोष निंबाळकर, शुभांगी साळुंखे या सर्व सदस्यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन  तांदूळ,मसूरडाळ,चवळी,मटकी,मूग ही कडधान्ये यांचे  २१७५ पॅकिंग करण्यासाठी सहकार्य केले.यासाठी शिक्षक सुरेश वाळके,हनुमंत पानसरे,हेमंत नाझरकर,विकास काळे,मुख्याध्यापक अमिना सय्यद यांनी देखिल खूप परिश्रम घेतले.

तसेच दापोडी येथील जिल्हा परिषद शाळा पहिली ते सातवीचे एकूण विद्याथी १३३ मुली मुले यांना आहार वाटप मुख्याध्यापिका संगीता खाडे व त्यांचे सर्व सहकारी यांनी आहाराचे वाटप केले.

Saturday, April 4, 2020

दापोडी येथे जुगार खेळणाऱ्याना समज देऊन सोडले?


केडगाव प्रतिनिधी ता.०४ एप्रिल २०२०
दौंड तालुक्यातील दापोडी येथील महावितरण कंपनीच्या शेजारी जुगारीचा डाव चालू आसल्याची माहिती  आज (ता.०४ एप्रिल) रोजी खब-यामार्फत पोलिसांना मिळाली.

तसेच त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून पाच ते दहा लोकांना पकडण्यात आले.त्यातील काही लोकांना त्याठिकाणीच सोडून देण्यात आले.आणि बाकीच्या व्यक्तीना कारवाईला आलेली टीम यांनी सोबत घेऊन चौकीला गेले.संबधीत पोलीस कर्मचारी यांना संपर्क केला असता जुगारीना समज देऊन आम्ही सोडुन दिले आहे असे कळाले.

लॉकडाऊनच्या काळात पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये.करोणाचा फैलाव रोखावा हा त्यामागचा उद्देश आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक धनंजय कापरे यांना विचारले असता याबाबत मला काहिच माहिती नाही. मी पाटस टोल नाक्यावर डयुटीवर असल्याचे त्यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागात सार्वजनीक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येत आहे.या लोकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Friday, April 3, 2020

दापोडी व खोपोडीमध्ये सँनिटायजर व साबणाचे वाटप।



केडगाव प्रतिनिधी : ता.०३ एप्रिल २०२०
दौंड़ तालुक्यातील दापोडी व  खोपोडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मोल-मजुरी करण-याना व ज्यांचे पोट भरण्यासाठी दारोदारी फिरवे लागत आहे.त्यांना साबणाचे वाटप करण्यात आले आहे.

स्वच्छ हात धुण्यासाठी साबणाचे वाटप करण्यात आले.तर या पूर्वी  गावात जंतूनाशक फवारनी केली होती यावेळी करोनाला हरवन्यासाठी स्वच्छता राखन्याचे आवहान सरपंच नंदा भांंडवलकर यांनी केले आह.

यावेळी ग्रामसेवक पुनम थोरात व भाऊसाहेब भांडवलकर यांच्या    उपस्थितीमध्ये ग्रामपंचायतच्या वतीने साबण वाटप करण्यात आले आहे.           

खोपोडी येथे सँनिटायजर व साबणाचे वाटप ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.

यावेळी गावतील सर्व लोकांना सँनिटायजर व साबण देण्यात येणार असल्याचे सरपंच सुवर्णा साळवे यांनी सांगीतले यावेळी उपसरपंच प्रफुल्ल शीतोळे, ग्रामसेवक उद्ध्व जाधव,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Thursday, April 2, 2020

दौंड | केडगाव | समाजातील विविध वंचित घटकांना जीवनाश्यक वस्तूचे वाटप !


केडगाव प्रतिनिधी २ एप्रिल                
केडगाव ता.दौंड येथील ग्रामपंचायत सदस्य नितीन कुतवळ यांच्या वतीने समाजातील विविध वंचित  घटकांना (ता.०२ एप्रिल) रोजी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.

तसेच यामध्ये वीटभट्टीवर काम करणारे कामगार,बांधकाम करणारे मजूर,कचरा गोळा करणारे घटक तसेच दारोदार फिरणारे फेरीवाले यांना शिधा वाटप करण्यात आले.

आम्ही हे सर्व प्रसिद्धीसाठी करत नसून यामधून बोध घेऊन समाजकार्य करणारे समाजसेवक यांनी पुढे येऊन मिळेल तशी मदत करावी हा यामागील उद्देश असल्याचे मत नितीन कुतवळ यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी राकेश लाड ,गोविंद भोंडवे,संजय गरदडे,महेंद्र गोसावी मेहेर ,राजेंद्र मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Wednesday, April 1, 2020

दौंड | यवत | संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी १३ युवकांवर गुन्हा दाखल !

केडगाव प्रतिनिधी : ता.०१ एप्रिल २०२०
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे बनले आहे. या विषाणूपासून वाचायचे असेल गरज नसताना नागरिकांनी बाहेर पडणे टाळायला हवे मात्र तसे होताना दिसत नसून शासकीय आदेशाची पायमल्ली करून मोकाटपणे बाहेर फिरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी आता पोलिसांनीही कंबर कसली असून यवत, केडगाव, बोरीपारधी येथे आज यवत पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत सुमारे १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

अनेकवेळा पोलिसांनी सूचना देऊनही बेफिकीरपणा करणाऱ्यांना यवत पोलिसांनीही जशास तसे उत्तर देत या १३ युवकांवर कलम१८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी या युवकांबाबत माहिती देताना यवत, केडगाव, बोरीपारधी या ठिकाणी लॉकडाउन आदेशाचे पालन न करता मोकाटपणे फिरत असलेल्या सुजित राजाराम करडे, संतोष बजरंग लोकरे, प्रसाद अशोक रोकडे (रा.यवत)  सुदाम बाळू चव्हाण, सुभाष बबन ताडगे, उमेश मछिंद्र देशमुख, दत्तात्रय प्रेमा जाधव, (रा.बोरीपारधी) चौफुला येथील शेखर विलास राजगुरू तसेच केडगाव येथील अमोल पोपट जाधव, रमेश तुकाराम सूळ, गणेश रामदास सरोदे, महेश दादासो गरदडे, किरण माणिक सरोदे या सर्वांना ड्रोन व पेट्रोलिंग करताना पकडण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले.