डी न्यूज लाइव्ह प्रतिनिधि : ता.०४ मे २०१९
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्ताने रविवार ता.०२ मे रोजी औरंगाबाद येथील संशोधन केंद्र,आमखास मैदानात पुंडलिक धनगर यांच्या ऊल्लेखणीय सामाजिक कार्याची दखल घेऊन भटक्या विमुक्त जाती जमाती आणि अदिवासी चळवळीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या औरंगाबाद येथील "भटक्यांचे भावविश्व" या मासिकातर्फे त्यांना सन्मानचिन्ह व सन्मान पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
हे सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र प्राचार्य ग.ह.राठोड यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण महर्षी माधव बोर्डे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या नेत्रदीपक सोहळ्यास सामाजिक,शैक्षणिक आणि पत्रकारिता या क्षेत्रातील जैष्ठ साहित्यिक के.ओ.गीर्हे,टी.एस.चव्हाण,प्राचार्य डॉ वामनराव जगताप,प्राचार्य एकनाथ खिल्लारे, प्राचार्य हसन ईनामदार,प्राचार्य के.जे.त्रिभुवन,जैष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंबादासजी रगडे नेहमीच भटक्या जाती जमाती आदिवासी चळवळीला सर्व प्रकारची ऊर्जा पुरविणारे ज्येष्ठ पत्रकार स.सो.खंडाळकर आणि अनेक मान्यवर तसेच कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
गोपाळ समाजहित महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुंडलिक धनगर यांना पुढील सामाजिक कार्यास पश्चिम महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पवार यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या आहेत.