डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधि - माहिती सेवाभावी समितीच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी मंगेश ज्ञानदेव फडके व गोपीनाथ संपत बारवकर यांची पुणे जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दारूबंदी आणि सामाजिक कार्याची आवड असल्याने माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष संदिप लगड यांनी दखल घेऊन त्यांची राज्य सचिवपदी नियुक्ती केली आहे.
त्याच बरोबर तरुण नेतृत्व म्हणून वरवंड येथील गोपीनाथ बारवकर यांची पुणे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ति केली आहे.माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य चे सामाजिक काम व संस्थेची ध्येय धोरणे जनसामान्य जनते पर्यन्त पोहचावी तसेच गाव तिथे शाखा सुरु करणार असल्याचे ही यावेळी अध्यक्ष संदीप लगड यांनी सांगितले.