Wednesday, May 29, 2019

नानगाव येथील बारावीत काजल पवार प्रथम !


डी न्यूज लाइव्ह प्रतिनिधी : दौंड तालुक्यातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या येथील ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स चा इयत्ता बारावीचा निकाल ९२.४७ टक्के लागला आहे.
बारावीच्या परिक्षेला या विदयालयातील एकूण ६६ विद्यार्थी बसले होते.त्यापैकी एकूण ६१ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
प्रथम क्रमांक पवार काजल दिलीप हिस ६५० गुणांपैकी ५३५ गुण प्राप्त करून ८२.३० टक्के मिळवले आहेत.द्वितीय क्रमांक चौधरी अनिशा ज्ञानदेव हिस ४७७ गुण प्राप्त करून ७४.३८ टक्के मिळवले आहेत.
तृतीय क्रमांक खळदकर वैष्णवी सुदाम हिस ४७१ गुण प्राप्त करून ७२.४६ टक्के मिळवले आहेत.
 अशी माहिती ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स चे मुख्याध्यापक बी.बी.गायकवाड यांनी दिली.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मुलीचे शिक्षण पूर्ण करताना काजलच्या आईस दुसऱ्याच्या शेतात मोल मजुरी करून काजल चे शिक्षण पूर्ण करावे लागले.काजलने या गोष्टीची जाण ठेऊन अभ्यासा वरती लक्ष केंद्रित करत बारावीत प्रथम क्रमांक पटकावला.नानगाव परिसरातील ग्रामस्थांना कडून काजल वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.काजल ला आवश्यक्यता आहे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन काजलला मदत करावी असे आव्हान शहाजी गिरे यांनी केले आहे.
यावेळी संस्थेचे सदस्य अशोक खळदकर,सरपंच सी.बी.खळदकर, माजी सरपंच राजकुमार मोटे व ग्रामस्थांनी विद्यालयातील शिक्षक व उत्तीर्ण विध्यार्थी यांचे आभार मानून अभिनंदन केले.

Sunday, May 19, 2019

माहिती सेवाभावी संस्थेच्या सचिव पदी मंगेश फडके व जिल्ह्याद्यक्ष पदी गोपीनाथ बारवकर यांची नियुक्ति




डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधि  -  माहिती सेवाभावी समितीच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी मंगेश ज्ञानदेव फडके व  गोपीनाथ संपत बारवकर यांची पुणे जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
दारूबंदी आणि सामाजिक कार्याची आवड असल्याने माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष संदिप लगड यांनी दखल घेऊन त्यांची राज्य सचिवपदी नियुक्ती केली आहे.
त्याच बरोबर तरुण नेतृत्व म्हणून वरवंड येथील गोपीनाथ बारवकर यांची पुणे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ति केली आहे.माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य चे सामाजिक काम व संस्थेची ध्येय धोरणे जनसामान्य जनते पर्यन्त पोहचावी तसेच गाव तिथे शाखा सुरु करणार असल्याचे ही यावेळी अध्यक्ष संदीप लगड यांनी सांगितले.