Saturday, April 6, 2019

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेत नानगावच्या दळवी प्रथम

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेत नानगावच्या दळवी प्रथम

डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधि : ता.०७ एप्रिल २०१९
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स नानगांव येथील शिक्षिका राजश्री सोमनाथ दळवी यांना भारत ज्ञान विज्ञान समुदाय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय लेखन स्पर्धेत प्रथक क्रमांक पटकावला आहे.30 मार्च रोजी घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये रायगड, अहमदनगर,सातारा आणि पुणे जिल्ह्यातून ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
स्वराज्यातील शेती धोरण आणि राज्यकर्ते,शिवराय आणि राजयकर्ते हे विषय देण्यात आले होते.
राजश्री दळवी या शालेय विविध उपक्रमात सहभागी असतात.नानगाव च्या शाळेत दळवी या कार्यरत झाल्यापासून त्यांनी शाळेत नव-नवीन संकल्पना आमलात आणून राबविल्या आहेत.