डी न्यूज लाइवः प्रतिनिधी : ता.१६ एप्रिल २०१९
दौंड तालुक्यात अनेक ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांची १२८ वी जयंती साजरी करण्यात आली.नानगाव,पारगाव,केडगाव व इतर ठिकाणी आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोठ्या जल्लोषात जयंती यावेळी साजरी करण्यात आली.
नानगाव ता.दौंड गणेशरोड येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे समाजमंदिर येथे ११ एप्रिल रोजी झालेली महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती व १४ एप्रिल रोजीची आंबेडकर जयंती एकाच वेळी आयोजित करण्यात आली होती.या दोन महापुरुषांच्या विचारंची देवाण-घेवाण होण्यासाठी त्यांचे विचार समाजात रुचवण्यासाठी हा आमचा नेहमीचाच प्रयत्न असतो असे यावेळी माणिक आढागळे यांनी सांगितले.
नानागाव ग्रामपंचायत येथे सकाळी सरपंच सी.बी.खळदकर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.बौद्ध युवक मंडळ नानगाव यांच्या वतीने बौद्धविहार येथून सायंकाळी ग्रामस्थांच्या समवेत गावातून मिरवणूक काढण्यात आली होती.व जेवणाची सोय सुद्धा यावेळी करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या वेळी विशाल शेलार,विष्णू खराडे,संजय रासकर,सचिन शिंदे,सचिन रणदिवे,काळे,विशाल आखाडे,बाळासाहेब रासकर,सतीष जाधव,स्वप्नील खळदकर व आदि मान्यवर उपस्थित होते.