दिपक पवार यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन युवा आदर्श पत्रकारीता पुरस्कार प्रदान !
प्रतिनिधी सासवड :ता.१२ मार्च २०१९
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व जगद्गुरू तुकोबाराय मराठी साहित्य परिषद आयोजित दहावे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन युवराज संभाजीराजे शहाजीराजे भोसले तंजावर तमिळनाडू व्यंकोजीराजे यांचे 13 वे वंशज यांच्या उपस्थितीत सासवड येथील आचार्य अत्रे नाट्यगृहात ता.१२ मार्च रोजी आयोजित करण्यात आले होते.
इतिहास संशोधनकार शरद गोरे व भा.ल.ठाणगे यांनी यावेळी खास आपल्या भाषा शैलीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव सादर केला.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद संमेलनाच्या पूर्वी केलेल्या कामाची पोच पावती म्हणून संजय सोनवणे यांची पुणे जिल्हा पूर्व विभाग अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
सामाजिक कामाची आवड,वृत्तपत्रात प्रतिनिधी म्हणून केलेले कार्य व इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्ट ची भूमिका बजावत असताना सर्वसामान्य जनतेच्या समस्या शासना पर्यंत पोहचवण्याचे काम चोख पणे बजावणारे नवयुवक दिपक पवार यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन युवा आदर्श पत्रकारीता या पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे पाहिले सत्र हे पुरस्कार समारंभ,दुसऱ्या सत्रात परिसंवाद व तिसऱ्या सत्रात कवींच्या कविता अशा प्रकारे कार्यक्रमाचे उत्तम नियोजन संयोजकांनी पार पाडला.
कार्यक्रमाच्या वेळी विशेष अतिथी तंजावर तमिळनाडू व्यंकोजीराजे यांचे 13 वे वंशज युवराज संभाजीराजे शहाजीराजे भोसले, संमेलनाध्यक्ष इतिहास संशोधक भा.ल.ठाणगे, उदघाटक विद्रोही लेखक तुकाराम सोनवणे, स्वागताध्यक्ष उपनगराध्यक्ष सासवड चे संजय गणपत जगताप,शरद गोरे,इतिहास संशोधक व "प्रेमरंग" चित्रपट निर्माते शरद गोरे ,दशरथ यादव,फुलचंद नागटिळक,सुनील लोणकर,नाना भोंगळे,राजकुमार काळभोर,रवी पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते.