Wednesday, December 26, 2018
Monday, December 24, 2018
Thursday, December 13, 2018
Friday, December 7, 2018
Thursday, December 6, 2018
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी महापरीनिर्वाण दिन नानगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा !

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी
महापरीनिर्वाण दिन नानगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा !
डी न्यूज लाईव्ह
प्रतिनिधी:ता.०६ डिसे.२०१८
बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर समाजसुधारक होते
त्याच बरोबर ते एक नेते, अर्थतज्ज्ञ, आणि उत्कृष्ट कायदेपंडित होते. बाबासाहेब आंबेडकर
सदैव दलितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांना समाजामध्ये समान न्याय
आणि वागणूक मिळवून देण्यासाठी झटत राहिले. त्यांचे संपूर्ण आयुष्य हा जातीय भेदभाव
आणि अस्पृश्यतेविरुद्धचा लढाच म्हणावं लागेल.म्हणून आज संपूर्ण भारतभर
बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन म्हणून साजरा करण्यात येतो.नानागाव
ग्रामपंचायत येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून
सर्वांच्या उपस्थिती मध्ये महापरीनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
गणेशरोड येथील समाजमंदिरा मध्येहि महापरीनिर्वाण दिन
साजरा करून अंगणवाडी येथील लहान मुलांना खेळणी वाटप करण्यात आले.यावेळी सरपंच
सी.बी.खळदकर,माजी सरपंच राजकुमार मोटे,माजी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती विशाल
शेलार,तंटामुक्ती अध्यक्ष संजय रासकर,माणिक आढागळे,विष्णू खराडे,दिपक पवार,दिलीप
खळदकर.डॉ.सातपुते,शिशुपाल,विशाल आखाडे व आदि मान्यवर उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)